उगवत्या बातम्या-१: फुलपाखरं काहीतरी सांगताहेत..

हॅलो दोस्तांनो 
'उगवत्या बातम्या' हे सदर आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या/घडणाऱ्या विशेष घटनांबद्दल बोलण्यासाठी आहे. ऋतूनुसार आपल्या सभोवतीच्या सृष्टीत - मग ती फुलं असोत, झाडं असोत, प्राणी पक्षी असोत किंवा इतरही जीव असोत - सतत विशेष गोष्टी घडत असतात. त्याच बरोबर अनेक ठिकाणी हे बदल टिपणाऱ्या, त्या त्या ठिकाणच्या पद्धती/प्रथा/सण असतात अशा सगळ्याबद्दल आपण या सदरात 'बोलणार' आहोत. यात कधी फोटो, कधी व्हिडिओच्या माध्यमातून झलक दाखवू आणि मग त्या घटनेबद्दल बोलू (तुम्ही माहिती ऑडियोत ऐकू शकाल.)
 
आजची उगवती बातमी: 
फुलपाखरं काहीतरी सांगताहेत...
छायाचित्र: पराग खरे
 

बघा बरं या फोटोंमध्ये काय दिसतंय? ही सगळी फुलपाखरं नक्की काय करताहेत? 

असं ते का करताहेत? हे असं करण्याचा अर्थ कोणता ऋतू संपतो आहे?

या सगळ्याबद्दल आपण आता ही माहिती ऐकूयात.