आम्ही गोष्ट लिहून रायलो २ - माझ्या पप्पाची स्कुटर

माझ्या पप्पाची स्कुटर

लेखक-सोनाली वाघमारेवर्ग५ वा,

जि. प. उ. प्राथमिक शाळा, गोवरी, जिल्हा चंद्रपूर

चित्र: प्रज्ञा ब्राह्मणकर
टिप: काही बोली भाषेतील शब्दांखाली टिंबांची रेघ दिसेल. त्यावर कर्सर फिरवल्यास त्या शब्दाचा अर्थ वाचता येईल

 

माझ्या पप्पाले वाटलं ,सगळे लोक गाडी घेत आहेत, आपण कायले माग राहावं?  तवा पप्पांन एक जुनी स्कुटर घेतली. पप्पा लई खुशीत होते. पप्पाले काही राहवलं नाही, संध्याकाळी पप्पांन गाडी काढली आन गे म्हणा सगळं गाव फिरून आले. जसे घरापाशी आले तसे पडले नालीत.

आमच्या घरापाशी नाली हाय,तेथ गाडी फिरवाले जागा नाही, पप्पाले काही जमलं नाही.

पहिले तर आमाले कोण पडले काही समजले नाही. आवाज आला म्हणून आम्ही बघण्यासाठी धावत बाहेर आलो. ते स्कुटर तर नाव गाळनाने भरली होती अन आमचे पप्पा पण.


"छि बाप्पा, नोय हे आमचे पप्पा!", असे मनुशा वाटले, पण का करते?
आईनं पाणी आणलं अन पप्पाले अंघोळ घातली. मले म्हणली, "सोने जा शाम्पू घेऊन ये." मी शाम्पू आणला.

पप्पाने तोंड शाम्पू लावून धुतलं, उरलेला शाम्पू अंगाले लावला. तवा कुठं वळखु येऊ लागले. "होय बाप्पा, आमचे पप्पाच होय!"

रात्री बाजेवर झोपल्यावर आम्ही मस्त हसलो. पप्पा बी हसू लागले.
असा आमचा फॅमिली ड्रॅमा रायते रोज!!