आपण यांना पाहिलंत का? - भाग ३

छोट्या मित्रमैत्रीणींनो,

'आपण यांना पाहिलं का?' या धाग्यावर आपण अनेक छायाचित्रे बघणार आहोत. या फोटोंमध्ये दिसणारी मंडळी, तुम्हाला तुमच्या अवतीभोवतीदिसण्याची दाट शक्यता आहे, किंवा तुम्ही त्यांना आधी पाहिलेही असेल.

भारतीय शहरांत/गावात सहज दिसणारे पक्षी, प्राणी, कीटक इत्यादी मंडळींचे फोटो इथे तुम्ही बघाल. फोटो बघून तुम्ही ओळखायचं आहे की हा फोटो कोणाचा आहे ते.

तुमचा अंदाज बरोबर आहे का, हे तुम्हाला सोबत असलेल्या ऑडीयो क्लिपवरून कळेलच. शिवाय त्या ऑडीयो क्लिपमध्ये त्या जीवाबद्दल छानशी माहितीही थोडक्यात दिलेली असेल. तर मग आहात सज्ज?

चला तर सांगा.. आपण यांना पाहिलंय का?

 

या भागातील पक्ष्याची छायाचित्रं टिपली आहेत, 'नितीन क्षेमकल्याणी' आणि 'मितेश सरवणकर' यांनी.

हा पहिला फोटो.. बघा हा पक्षी ओळखु येतोय का?


छायाचित्र - मितेश सरवणकर

आता हा दुसरा फोटो बघा, त्याच्या शेपटीखालचा रंग, शेपटीचं टोक, डोक्यावरचा तुरा बघा.

छायाचित्र - नितीन क्षेमकल्याणी


हा पक्षी तुम्ही ओळखला असेल किंवा नसेल, त्याबद्दल ही माहिती ऐकायला तुम्हाला आवडेलच.

उत्तर आणि पक्ष्याच्या माहितीसाठी पुढील चौकटीतल्या 'प्ले' (आडवा त्रिकोण) बटणावर क्लिक करा:

ऐकलंत? त्यात सांगितल्याप्रमाणे हा बघा त्या पक्षाचा भाऊबंद.


छायाचित्र - मितेश सरवणकर

पक्ष्याच्या माहितीसाठी पुढील चौकटीतल्या 'प्ले' (आडवा त्रिकोण) बटणावर क्लिक करा:

याआधीच्या भागात : भाग १ | भाग २

पुढिल भाग: भाग ४