सुट्टीतील धमाल १३: फेस पेंटिंग

सुट्टीतील धमाल १३:

फेस पेंटिंग
रेखाचित्र आणि चेहेऱ्यावरील रंगकाम: पंचम कुलकर्णी (इयत्ता १ली, आनंदक्षण)

 

तुम्ही कधी आपले चेहरे रंगवलेत का? आपला एक मित्र पंचम याला चित्र काढायला आवडतातच, पण त्यासोबत स्वतःचा चेहरा रंगवायला सुद्धा. सोबत त्याने काढलेलं रेखाचित्र देतोय, त्याच बरोबर त्याच्या रंगवलेल्या चेहऱ्याचा फोटोही. तुम्हालाही असं करून पहायचं असेल तर हे कसं केलं याबद्दल पंचमने एक लहानसा व्हिडीओ पाठवला आहे. तो ऐका. मात्र हे करण्याआधी तुमच्या आई-बाबांची परवानगी घ्या काय!

 
रेखाचित्र:
 
 
रंगवलेल्या चेहऱ्याचा फोटो:
 
 
हे कसं केलं?:
 

==============================

'सुट्टीतील धमाल'बद्द्ल मॉनिटर उवाच:

मुलांनो, आता तुम्हाला सुट्टी लागली असेल ना किंवा करोनाची साथ असल्याने शहाण्यासारखे तुम्ही घरातच बसून असाल. मग तुम्ही या सुट्टीत काय करताय हे इतरांबरोबर शेअर कराल का? तुम्ही एखादी गोष्ट लिहिली असेल, कविता लिहिली असेल किंवा घरबसल्या काही मजेशीर खेळ खेळला असाल, छानसं चित्र काढलं असेल किंवा तुमच्यासोबत करोनामुळे घरातच असणाऱ्या आईबाबा किंवा आजीआजोबांसोबत काहीतरी भारी उपक्रम/खेळ खेळत असाल, एखादा पदार्थ शिकला असाल तर आम्हालाही नक्की सांगा. तुम्ही खेळताय त्या खेळाचा/कृतीचा व्हिडियो आम्हाला पाठवलात तरी चालेल!या सदरात येणारं लेखन हे सुट्टीत मुलांनी घरी बसण्यास प्रोत्साहन म्हणून जसंच्या तसं प्रकाशित केलं जाईल. अर्थात यावर कोणत्याही प्रकारचं संपादन केलेलं नसेल. जे काय कराल ते मात्र घरातच करता येण्याजोगे हवे. या "सुट्टीतील धमाल" नावाच्या सदरामध्ये अश्या गोष्टी सुट्या किंवा एकत्र करून आम्ही प्रकाशित करू. मग त्या तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा वाचता/बघता येतील!

आम्हाला तुमचं लेखन/कृती पाठवायचा पत्ता आहे - monitor.atakmatak@gmail.com