सुट्टीतील धमाल ५ - जादू!! (व्हिडीओ)

जादू!!
कलाकारः काव्या कुलकर्णी (इयत्ता २री, अक्षरनंदन)
संकल्पनाः नेहा कुलकर्णी । चित्रीकरण व संकलनः अभिजित कुलकर्णी

 

 जादूचे प्रयोग मुलांच्या आवडीचे असतातच. पण दुसरीत शिकणारी काव्या प्रयोग बघून थांबली नाही तर ती जादू कशी केली असेल याचा विचार ती करत गेली, शिकत गेली. आता हळुहळू जादूच्या प्रयोगासाठी लागणारं साहित्य स्वतः बनवून त्याचे प्रयोग करता येऊ लागले आहेत. चला तर बघुया आज ती कोणती जादू करून दाखवतेय...

 

 

==============================

'सुट्टीतील धमाल'बद्द्ल मॉनिटर उवाच:

मुलांनो, आता तुम्हाला सुट्टी लागली असेल ना किंवा करोनाची साथ असल्याने शहाण्यासारखे तुम्ही घरातच बसून असाल. मग तुम्ही या सुट्टीत काय करताय हे इतरांबरोबर शेअर कराल का? तुम्ही एखादी गोष्ट लिहिली असेल, कविता लिहिली असेल किंवा घरबसल्या काही मजेशीर खेळ खेळला असाल, छानसं चित्र काढलं असेल किंवा तुमच्यासोबत करोनामुळे घरातच असणाऱ्या आईबाबा किंवा आजीआजोबांसोबत काहीतरी भारी उपक्रम/खेळ खेळत असाल, एखादा पदार्थ शिकला असाल तर आम्हालाही नक्की सांगा. तुम्ही खेळताय त्या खेळाचा/कृतीचा व्हिडियो आम्हाला पाठवलात तरी चालेल! जे काय कराल ते मात्र घरातच करता येण्याजोगे हवे. या "सुट्टीतील धमाल" नावाच्या सदरामध्ये अश्या गोष्टी सुट्या किंवा एकत्र करून आम्ही प्रकाशित करू. मग त्या तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा वाचता/बघता येतील!

आम्हाला तुमचं लेखन/कृती पाठवायचा पत्ता आहे - monitor.atakmatak@gmail.com