सुट्टीतील धमाल ६ - शिकूया घडीची पोळी! (व्हिडीओ)

शिकूया घडीची पोळी!

कलाकारः अर्णव भिडे (इयत्ता दुसरी, अक्षरनंदन)
संकल्पना व चित्रीकरणः प्राची भिडे

सुट्टीत मुलांनी केलेली धमाल आपण बघतोच आहोत. त्याच मालिकेत, दुसरीत शिकणाऱ्या अर्णवने या सुट्टीत पोळ्या लाटायला शिकायचा चंग बांधला आणि बघता बघता त्याला घडीच्या पोळ्याही व्यवस्थित लाटता आणि भाजता येऊ लागल्या.

अन्न रांधता येणं ही माणसाची प्राथमिक गरज असूनही कित्येक मोठ्या व्यक्तींनाही हे कसब शिकायची इच्छा होत नाही.

अशा वेळी या लहानग्या मित्राने सुट्टीत केलेला या प्रयत्न कसला भारी आहे ना! तुम्हीही शिकणार ना?

 

==============================

'सुट्टीतील धमाल'बद्द्ल मॉनिटर उवाच:

मुलांनो, आता तुम्हाला सुट्टी लागली असेल ना किंवा करोनाची साथ असल्याने शहाण्यासारखे तुम्ही घरातच बसून असाल. मग तुम्ही या सुट्टीत काय करताय हे इतरांबरोबर शेअर कराल का? तुम्ही एखादी गोष्ट लिहिली असेल, कविता लिहिली असेल किंवा घरबसल्या काही मजेशीर खेळ खेळला असाल, छानसं चित्र काढलं असेल किंवा तुमच्यासोबत करोनामुळे घरातच असणाऱ्या आईबाबा किंवा आजीआजोबांसोबत काहीतरी भारी उपक्रम/खेळ खेळत असाल, एखादा पदार्थ शिकला असाल तर आम्हालाही नक्की सांगा. तुम्ही खेळताय त्या खेळाचा/कृतीचा व्हिडियो आम्हाला पाठवलात तरी चालेल! जे काय कराल ते मात्र घरातच करता येण्याजोगे हवे. या "सुट्टीतील धमाल" नावाच्या सदरामध्ये अश्या गोष्टी सुट्या किंवा एकत्र करून आम्ही प्रकाशित करू. मग त्या तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा वाचता/बघता येतील!

आम्हाला तुमचं लेखन/कृती पाठवायचा पत्ता आहे - monitor.atakmatak@gmail.com