सुट्टीतली धमाल ७ः मनलेखन!

सुट्टीतली धमाल ७ः मनलेखन!

आज आपण दोन मैत्रिणींनी सुट्टीत केलेलं लेखन बघणार आहोत.

गोष्टः जंगलातील मज्जा
लेखन आणि चित्रेः गार्गी प्रसाद देशपांडे
 ३री, पोतदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर

पहिली गोष्ट लिहिली आहे कोल्हापुरच्या 'पोतदार इंटरनॅशनल स्कूल' मधील गार्गीने. सोबतची सुंदर चित्रंही तिनेच काढली आहेत बरं.

या चित्रांसोबत ही कथा इतकी छान, गोड दिसते आहे की आम्ही ती टाईप न करता तिने पाठवली तशीच प्रकाशित करायचं ठरवलं.

बघूया बरं काय आहे ती गोष्ट!

 

कोरोना आणि मी
लेखन व चित्रेः रेवती वैभव जपे, वय ७ वर्षे
 

आता दुसरं लेखन आपल्याला पाठवलं आहे रेवती जपे. ही आपली मैत्रीण युरोपात शिकते आहे. करोनामुळे तिथेही घरीच बसावे लागते आहे. तिला मराठी बोलता येतच होतं, पण या सुट्टीत तिने मराठी देवनागरीमध्ये लिहायला शिकायचा चंग बांधला आणि काहीच दिवसात ती शिकली सुद्धा. आज तिने स्वतः मराठीत लिहिलेलं हे मनोगत वाचूया का? तिला आणखी मराठीत लिहिण्यासाठी शुभेच्छा द्यायला विसरू नकाः

 
रेवतीच्या हस्ताक्षरात लेखन:
 

==============================

'सुट्टीतील धमाल'बद्द्ल मॉनिटर उवाच:

मुलांनो, आता तुम्हाला सुट्टी लागली असेल ना किंवा करोनाची साथ असल्याने शहाण्यासारखे तुम्ही घरातच बसून असाल. मग तुम्ही या सुट्टीत काय करताय हे इतरांबरोबर शेअर कराल का? तुम्ही एखादी गोष्ट लिहिली असेल, कविता लिहिली असेल किंवा घरबसल्या काही मजेशीर खेळ खेळला असाल, छानसं चित्र काढलं असेल किंवा तुमच्यासोबत करोनामुळे घरातच असणाऱ्या आईबाबा किंवा आजीआजोबांसोबत काहीतरी भारी उपक्रम/खेळ खेळत असाल, एखादा पदार्थ शिकला असाल तर आम्हालाही नक्की सांगा. तुम्ही खेळताय त्या खेळाचा/कृतीचा व्हिडियो आम्हाला पाठवलात तरी चालेल!या सदरात येणारं लेखन हे सुट्टीत मुलांनी घरी बसण्यास प्रोत्साहन म्हणून जसंच्या तसं प्रकाशित केलं जाईल. अर्थात यावर कोणत्याही प्रकारचं संपादन केलेलं नसेल. जे काय कराल ते मात्र घरातच करता येण्याजोगे हवे. या "सुट्टीतील धमाल" नावाच्या सदरामध्ये अश्या गोष्टी सुट्या किंवा एकत्र करून आम्ही प्रकाशित करू. मग त्या तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा वाचता/बघता येतील!

आम्हाला तुमचं लेखन/कृती पाठवायचा पत्ता आहे - monitor.atakmatak@gmail.com