कुल्फी लेखन स्पर्धा निकाल 2024
गेल्या महिन्यात कुल्फीतर्फे एक लेखन स्पर्धा घेतली होती. त्याला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून उत्तम प्रतिसाद मिळाला. तब्बल २७६ मुलांनी आम्हांला लेखन पाठवले. त्यात आलेल्या लेखनापैकी सर्वात दर्जेदार ठरलेल्या लेखनांना आम्ही विजेते म्हणून घोषित करत आहोत. आम्ही प्रथम/द्वितीय असे क्रमांक काढलेले नाहीत. या यादीतील सर्वच जण विजेते आहेत. सर्व विजेत्यांना त्यांचे बक्षीस ऑक्टोबर महिन्यापर्यंत घरपोच करण्यात येईल. तसेच जरी सगळ्या विजेत्यांचं लेखन खूप छान असलं, तरी अंकांतील जागेची मर्यादा लक्षात घेऊन त्यातलं काही लेखनच येत्या वर्षीच्या वेगवेगळ्या अंकांत वाचायला मिळेल. या सगळ्या विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. ज्यांना या वेळी विजेते होता आले नाही त्यांना आणखी चांगला प्रयत्न करण्यासाठी शुभेच्छा. सर्व सहभागी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे मनापासून आभार!