कुल्फी उन्हाळी'२४ अंक कुठे मिळेल?

उन्हाळा सुरू होतोय, सुट्ट्या सुरू होताहेत. अश्या वेळी सगळ्यांना कुल्फी हवी असेलच! लवकरच येतोय ‘कुल्फी’चा गुढीपाडवा अंक - अर्थात उन्हाळी अंक! सुट्टी म्हटलं की सगळ्यांत घनिष्ट संबंध असतो खेळांशी. मुलं आणि खेळ अभिन्न आहेत. त्यात यंदाचं ऑलिंपिक वर्ष आहे, तेव्हा हा गुढीपाडवा अंक असेल खेळ विशेषांक.

ऑलिंपिक स्पर्धांत घडलेल्या गोष्टींपासून ते गल्लीत खेळायच्या बॅटबॉलपर्यंत आणि भविष्यातील खेळांच्या गोष्टींपासून ते ऐतिहासिक खेळांच्या फॅनफिक्शनपर्यंत खेळ या विषयाला वाहिलेला हा अंक मुलांची सुट्टी रसाळ, थंडगार, मजेशीर करेल यात आम्हांला शंका नाही.

ज्यांनी दिवाळी अंकाच्या वेळी वर्षातील तीनही अंक नोंदवले आहेत त्यांनी पुन्हा नोंदणी करू नये. त्यांचे अंक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पाठवले जातील.

ज्यांना या खेळ विशेषांकाची नोंदणी करायची आहे ते पुढील पद्धतींपैकी कोणत्याही पद्धतीने नोंदणी करू शकतात : 

१. उन्हाळी अंक घरपोच मागवता येईल (टपाल खर्च अधिक) किंवा पुण्यातून दिलेल्या काही जागांवरून पिकअप करता येईल

नोंदणी करण्याची लिंक :  https://forms.gle/VrGEMEq3BR2EbkK69

 

२. अमेझॉन वरून ऑनलाईन मागवता येईल :

https://amzn.in/d/4rlaCNc

 

२. पुढील दुकानांमध्ये कुल्फी उपलब्ध आहे :

३. जर तुम्ही कुल्फीच्या मित्र शाळांपैकी एक असाल तर तुमच्या शाळेच्या गटावर एक लिंक आली असेल. ती वापरून नोंदणी केल्यास अंक मुलांना थेट शाळेत मिळेल (त्यासाठी टपाल खर्चही लागणार नाही). सध्या ही योजना पुढील शाळांनी स्वीकारली आहे. या व्यतिरिक्त कोणत्या शाळांना रस असेल तर शाळेतील शिक्षकांनी आमच्याशी ९८२०१४४१९६ या क्रमांकावर संपर्क साधावा : 

कुल्फी मित्र शाळा : 

पुणे : अक्षरनंदन, आनंदक्षण, प्रक्रिया को लर्निंग सेंटर, ज्ञानप्रबोधिनी   |    नाशिक : आनंद निकेतन

मुंबई : अ. भि. गोरेगावकर शाळा   |    फलटण : कमला निंबकर बालभवन   |    बेळगाव : मराठी विद्यानिकेतन

  

डोनेट कुल्फी 

तुम्ही कुल्फीचा दर्जा, धडपड गेले तीन अंक अनुभवता आहात. कसदार साहित्य, चित्र आणि अंकाच्या डिझाईनमुळे हे शक्य होतं. अशी दर्जेदार निर्मितीमूल्य असलेला अंक काढण्यासाठी अंकांची काही एक किंमत ठेवणंही अपरिहार्य ठरतं.
पण म्हणून मिळकत कमी असणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी 'कुल्फी' नाही का? तसं अजिबात नाही. या मुलांपर्यंत पोचायला आम्हांला तुमची मदत हवी आहे.
Donate कुल्फी : https://forms.gle/77xot8xc8nRg2mxf6