लिहिते व्हा! - 2025

मुलांच्या सर्जनशीलतेला एक व्यासपीठ मिळावं या उद्देशाने 'कुल्फी'तर्फे गेल्या वर्षी मुलांसाठी लेखन स्पर्धा आयोजित केली होती. यंदा या स्पर्धेला एका उपक्रमाचं स्वरूप देत आहोत. या उपक्रमात उल्लेखनीय लेखन करणाऱ्या निवडक मुलांसाठी येत्या वर्षात एका शनिवार / रविवारी विशेष कार्यशाळा पुण्यात आयोजित करण्यात येईल. प्रसिद्ध बालसाहित्यिक माधुरी पुरंदरे आणि वसीम मणेर मुलांना लेखनप्रक्रियेच्या विविध बाबींवर एका दिवसाच्या कार्यशाळेत निवडक मुलांसोबत काम करतील. या कार्यशाळेत मुलांना जगभरातल्या उत्तमोत्तम बालसाहित्य वाचायला मिळेल आणि सोबत इतरही रंजक उपक्रमामध्ये सहभाग घेता येईल.

याचे तपशील पुढीलप्रमाणे

वयोगट - तिसरी ते दहावी इयत्तेमधील विद्यार्थी

लेखन विषय -

१. पुढे 'प्रशांत सोनी' यांचं एक चित्र दिलं आहे. (हे चित्र मोठ्या आकारात कुल्फी उन्हाळी 2025 अंकातही बघता येईल) हे चित्र बघून स्फुरलेलं कोणतंही ललित लेखन, गोष्ट, कविता असं काहीही लिहिता येईल. (शब्दमर्यादा ५०० शब्द) 

२. पुढीलपैकी एका विषयाला धरून कथा किंवा कल्पनाविस्तार करा. (शब्दमर्यादा ५०० शब्द)

मला शिक्षा झाली तेव्हा...

माझ्या अक्षरामुळे झालेली गंमत...

आणि मला हसू फुटलं

पाळलेला प्राणी सोडून गेल्यानंतर

आमच्या शेजारचं बाळ

३. पुढील पैकी कोणत्याही विषयावर अनुभवलेखन किंवा कविता - (शब्दमर्यादा ५०० शब्द)

सिनेमा

वारी

गावातली जत्रा/उरूस

मोबाइल गेम्स

क्रिकेट मॅच

हॅरी पॉटर

 ४. कोणताही विनोदी प्रसंग/लेखन (शब्दमर्यादा ५०० शब्द)

 ५. अल्पाक्षरी लेखन – म्हणजे अगदी कमी शब्दांत केलेले कोणत्याही प्रकारचे ललित लेखन (उदा. एखादा किस्सा, गोष्ट, एखाद्या जागेचं वर्णन, एखादं पत्र आणि इतर कोणतेही विषय. माहितीपर लिखाण नाही.) (शब्दमर्यादा १५० शब्द)

 

महत्त्वाच्या सूचना :

१. मुलांनी केलेलं लेखन ही त्यांची स्वतःची रचना हवी. लेखन पूर्वप्रकाशित किंवा अनुवादित नसावं.
२. लेखन मराठीत असावं. मात्र ते प्रमाण मराठीतच असावं असं बंधन नाही.
३. लेखन कागदावर लिहिलेलं असल्यास सुवाच्य असावं. सर्व पानांचे फोटो एकत्र करून एकच एकत्रित पीडीएफ फाइल पाठवावी. लेखन टाइप केलं असल्यास ते युनिकोडमध्ये असावं.
४. काही शारीरीक कारणांमुळे लिहिणं किंवा टाइप करणं शक्य नसेल तर गोष्ट रेकॉर्ड करून ऑडिओ फाइल पाठवता येईल.

 

लेखन पाठवण्याची अंतिम तारीख : ३० जून २०२५

अंतिम निवडीची घोषणा - सप्टेंबर २०२५ (तिसरा आठवडा)

लेखन कुठे पाठवाल : kulfi.atakmatak@gmail.com 

लेखन पीडीएफ फाइलमध्ये किंवा यूनिकोडमध्ये टाइप केलेलं असावं. 

लेखनासोबत पाठवायची अनिवार्य माहिती

अ) लेखक विद्यार्थी/विद्यार्थिनी नाव
ब) शाळेचं नाव, इयत्ता/तुकडी
क) शहर/गावाचं नाव
ड) घरचा पत्ता
इ) पालकांचा मोबाइल नंबर (शक्यतो whatsapp)