एप्रिल फूल (बडबडगीत)

एप्रिल फूल
कवयित्री: दिप्ती देशपांडे, कोल्हापूर


चंगू आणि मंगू, दोघे सख्खे भाऊ
भुकेलेला चंगू, म्हणे अरे मंगू

दे मला खाऊ, पोटात कावळे भाऊ
अरे अरे मंगू, मी का देऊ खाऊ?

किचनमध्ये जाऊ, तूच खाऊ घेऊ
गार गार खाऊ, फ्रीजमधून घेऊ

गारेगार आईस्क्रू, चॉकू नी काजू
डब्बाभरुन केकू, जाऊन तू घेकू

कर आता घायू, बोलू नको कायू
उघडला फ्रीजू, खायचे होते काजू

चंगू झाला चिडू, मंगू खाई झाडू
हाऽ हाऽ हूँऽ हूँऽ, फसला चंगू भाऊ

एप्रिल फूल भाऊ, म्हंटले मजा घेऊ!

---०००---

श्रेयअव्हेर: सोबतचे चित्र हे जालावरील तयार प्रताधिकार मुक्त चित्रप्रतिमा वापरून त्यावर थोडे संस्करण करून तयार केले आहे.