सुट्टीतील धमाल (पर्व दुसरे) - ३ : कला (कविता)

सुट्टीतील धमाल (पर्व दुसरे) - ३

कला
लेखन  : रूद्र मेमाणे
चित्र : प्रवेद चौधरी

दोघेही इयत्ता ७ वी, अक्षरनंदन शाळा, पुणे

 

माणूस असला कसाही जरी
कला असते प्रत्येकात काहीतरी

कोणी वाजवतो वाद्य छान
कुणाला असतो चित्रांचा अभिमान

कोणत्याही भावना व्यक्त होतात कलेतून
फक्त आलं पाहिजे ते मनातून

कला सर्वत्र असते सारखी
फक्त पाहणारी नजर पाहिजे पारखी

आपणही आहोत निसर्गाची कलाकारी
अरे... कलेत डोकावून पहा
विसराल आपली दु:खे सारी!

=============

'सुट्टीतील धमाल'बद्दल मॉनिटर उवाच:

मुलांनो, आता तुम्हाला सुट्टी लागली ना. आम्हीही 'सुट्टीतील धमाल' या सदराचे हे दुसरे पर्व सुरू करत आहोत. तुम्ही या सुट्टीत काय करताय हे इतरांबरोबर शेअर कराल का? तुम्ही एखादी गोष्ट लिहिली असेल, कविता लिहिली असेल किंवा घरबसल्या काही मजेशीर खेळ खेळला असाल, छानसं चित्र काढलं असेल किंवा आईबाबा /आजीआजोबांसोबत काहीतरी भारी उपक्रम/खेळ खेळत असाल, एखादा पदार्थ शिकला असाल तर आम्हालाही नक्की सांगा. तुम्ही खेळताय त्या खेळाचा/कृतीचा व्हिडियो आम्हाला पाठवलात तरी चालेल! या सदरात येणारं लेखन हे सुट्टीत मुलांनी नवनवीन गोष्टी करून पाहण्याला प्रोत्साहन म्हणून जसंच्या तसं प्रकाशित केलं जाईल. अर्थात यावर कोणत्याही प्रकारचं संपादन केलेलं नसेल. या "सुट्टीतील धमाल" नावाच्या सदरामध्ये अश्या गोष्टी सुट्या किंवा काही जणांच्या एकत्र करून आम्ही प्रकाशित करू. मग त्या तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा वाचता/बघता येतील!

आम्हाला तुमचं लेखन/कृती पाठवायचा पत्ता आहे - monitor.atakmatak@gmail.com