पादणंही गरजेचं रे! (कविता)

मूळ हिंदी कविता: अतुल रॉय, बी.डी. कॉलेज, पाटणा, बिहार

स्वैर अनुवाद: ऋषिकेश  | चित्र: मल्हार गुरव, इयत्ता पहिली, अक्षर नंदन

 --------

पादणंही गरजेचं रे!

 

डाळ भात चपाती
नि कांद्याची साथ रे
पादण्याचा अपुला
'अलगही अंदाज' रे

 

एखादा पूर्णपणे

विनाआवाज 'सोडतो' रे
आवाजच काहींचं
सारं गुपित फोडतो रे

 

खूप मसाल्यांनी कधी
मुरडा पोटी पडतो रे
इनो पित पितच मग
कोणीतरी सोडतो रे

 

झोप पूर्ण नसल्याने
अन्न पचत नाही रे
च्याऊमाऊ खाऊन
पोटात गॅस बनतो रे

 

पोटात फिरत्या सुरीपरी
पोटात दुखू लागतं रे
तब्येतीत राहायचं तर
पादणंही गरजेचं रे

 -------

टीप: मूळ कविता ही "चकमक" या मुलांसाठी हिंदीतून निघणाऱ्या नियतकालिकाच्या अन्नपचन या विषयाला वाहिलेल्या विशेषांकात आली होती. त्याचा हा स्वैर अनुवाद.  मूळ कविता इथे देतोय.  सदर मूळ कविता आम्हाला पाठवल्याबद्दल श्री. फारूक काझी यांचेही आभार.