सुट्टीतील धमाल (पर्व दुसरे) - १ : आंब्यांची दुनिया (कविता)

सुट्टीतील धमाल (पर्व दुसरे) - १

आंब्यांची दुनिया
लेखन: अन्वित शीतलकुमार भोंग, इयत्ता ३ री, अक्षरनंदन, पुणे
चित्र: वेदांत शिंदे, इयत्ता ८वी, मिलेनियम नॅशनल स्कूल, पुणे

 

आंब्यांच्या नगरीमध्ये आंबे आहेत खूप,
चाहे असो बारीश चाहे असो धूप।।

आंब्यांच्या नगरीमध्ये आंबे भरपूर,
नद्यांनाही येतो आमरसाचा पूर।।

आंब्याच्याच गाड्या तिथे, आंब्याचीच घरे
जिकडे तिकडे दिसतात आमरसाचे झरे।।

पक्षी खातात आंबे तिथे माणसेही खातात
पाणी म्हणून तिथे आमरसच पितात।।

माणसे आंब्यासारखी दिसतात पक्षीही दिसतात
जिकडे बघू तिकडे Mango Mango ओरडतात।।

इकडे नाही वाचनालय, इकडे नाही शाळा
तुम्हाला जिथे वाटतंय तिकडे हमखास पळा।।

आंब्याच्या दुनियेमध्ये आंबे इतके असतात
आंबे काढता काढता माणसे थकून जातात।।

आंब्याचाच पलंग तिथे आंब्याचाच सोफा
या, बसा, खेळा आणि इथेच गाढ झोपा।।

आंब्याचीही दुनिया आहे खूप अनोखी
म्हणून इकडची माणसं कध्धी नसतात दु:खी।।

 

=============

'सुट्टीतील धमाल'बद्दल मॉनिटर उवाच:

मुलांनो, आता तुम्हाला सुट्टी लागली ना. आम्हीही 'सुट्टीतील धमाल' या सदराचे हे दुसरे पर्व सुरू करत आहोत. तुम्ही या सुट्टीत काय करताय हे इतरांबरोबर शेअर कराल का? तुम्ही एखादी गोष्ट लिहिली असेल, कविता लिहिली असेल किंवा घरबसल्या काही मजेशीर खेळ खेळला असाल, छानसं चित्र काढलं असेल किंवा आईबाबा /आजीआजोबांसोबत काहीतरी भारी उपक्रम/खेळ खेळत असाल, एखादा पदार्थ शिकला असाल तर आम्हालाही नक्की सांगा. तुम्ही खेळताय त्या खेळाचा/कृतीचा व्हिडियो आम्हाला पाठवलात तरी चालेल! या सदरात येणारं लेखन हे सुट्टीत मुलांनी नवनवीन गोष्टी करून पाहण्याला प्रोत्साहन म्हणून जसंच्या तसं प्रकाशित केलं जाईल. अर्थात यावर कोणत्याही प्रकारचं संपादन केलेलं नसेल. या "सुट्टीतील धमाल" नावाच्या सदरामध्ये अश्या गोष्टी सुट्या किंवा काही जणांच्या एकत्र करून आम्ही प्रकाशित करू. मग त्या तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा वाचता/बघता येतील!

आम्हाला तुमचं लेखन/कृती पाठवायचा पत्ता आहे - monitor.atakmatak@gmail.com