करम को फल (पोवारी कथा)

करम को फल
लेखन - गुलाब बिसेन, कोल्हापूर
चित्रे - प्राची केळकर-भिडे

एक जंगलमा दुय कोल्ह्या रवत होता. एकको नाव होतो चिंगा अना दुसरोको होतो टिंगा. दुयी जोळी दोस्तीसाती पुर् जंगलमा मसहुर होती. कोल्ह्याकी जात धोकेबाजीसाती सुप्रसिद्ध से पर हे आपल् बिरादरीला अपवाद होता. दुयी एकदुसरोका साजरो दोस्त होता. दुयीजन मिलस्यान शिकार करत अना आपलो पोट भरत. कब् खुद शिकार करत त् कब् दुसर् मोठ् प्राणीनन् करे शिकारलक पोट भरत.

दुयीजन हररोज सकारीसकारी शिकारला निकलत. मिलस्यान शिकार करत. अना मिलबाटस् शिकार खात. चिंगा कोल्ह्या स्वभावलक समजुतदार अना मनको दिलदार होतो. टिंगा कोल्ह्या थोळो स्वार्थी स्वभावको होतो. बहुतबार वू चिंगाला फसायस्यान खुद शिकारको जादा हिस्सा खायले. असो रयेपरबी दुयीनला एकदुसरो सिवाय गमत नोहतो. दुयीको दोस्ती चांगलीच जमीती.



एकरोज चिंगा अना टिंगा सकार सुकार शिकारला निकल्या. बहुत समय फिरेपरबी वूनला शिकार काही मिली नही. वोकमा उनारोको गरम गरम झकारयीनलक वूनक् आंगकी आग होत होती. एतरोमा अचानकच वूनला ससाको खळका मिलेव. जवरक् एक झुळुपमा तपनक् तळाखालक बचनसाती ससा हातपाय गुंडस्यान बसेतो. वोला वहानलक हकालस्यान चिंगान् मोकर् जागामा आणिस. वोतरोमाच लुकस्यान बसेव टिंगान् कुदस्यान वोकी मान धरीस अना ससाको खेल खलास करीस.

ससाकी शिकार अना वाबी भर तपनमा. दुयीला भलतोच धम भरेतो. सकारपासून भुक्ंपोट जंगलभर शिकारसाती फिरेलक वूनला बहुतच भूक लगीती. वोकंमाबी उनारोक् गर्मीलक गरो सुकस्यान जीव जासेका का असो दुयीला भयेतो. वोकंलक पयले पाणी पियस्यान शिकार खानको दुयीन् ठयरायीन. पयले एकन् पाणी पिवनला जानको. तब्ंवरी दुसरोन् झाळखाल्या सावलीमा बसस्यान शिकार राखनको. बादमा दुसरोन् पाणी पिवनला जानको अना पयलोन् शिकार राखत बसनको.

ठयरायेव हिसाबलक चिंगा पयले पाणी पिवन गयेव. अना टिंगा शिकार राखत बसेव. घळीभरमाच ससाकी कोवरी शिकार देख टिंगाक् टोंडला पाणी सुटन बसेव. वोकलक चिंगाक् आवतवरी शिकारकी चव चाखस्यान देखनको वोन् सोचिस. एकघन वोन् चव चाखस्यान देखीस. पर वोला एकघन चव चाखस्यान शांत रयस्यान नही भयेव. ससाकी ताजी शिकारच वोक् नजरपुळ् फिरत होती. वोन् काही रयस्यान नही भयेव. अना वोन् चिंगाकी बाट न देखता शिकार खानला सुरू करीस. देखता देखता उपाशी टिंगान् शिकारको चांगलो मासको भाग खाय टाकीस. आखरीमा बच्या सिर्फ हाळा.

पाणी पिवनला गयेव चिंगा वापस आयेपर वोला धक्काच बसेव. टिंगापुळ् शिकारमालक बच्या हाळाच पळ्याता. चिंगालात् बिस्वासच बसत नोहतो. वू टिंगाकन अचंबालक देखन बसेव. चिंगाक् असो शंकास्पद भावलक् देखनोलक टिंगा थातुरमातुर काहीबाही सांगन बसेव.
" चिंगा , तोर् पाणी पिवनला जायेपर याहान बाग आयेतो. वोन् मोला एकटो देखस्यान मोरोपर हमला करीस. अना मोला काही समजनक् पयलेच शिकार खायटाकीस. मी जीव बचावनसाती याहानलक दुर पराय गयेव. तो बुलावूनच कयेव वोतरोमा तूच आय गयेस."
चिंगा स्वभावको भोलो होतो. वोला टिंगाको बोलनो खरोच लगेव.
" ठिक से. सिर सलामत त् पगळी पचास. बची सिकार खायस्यान आपन दुपार काहाळबी. तपन कमी आयेपर रातको सोचबी." चिंगा समजुतदारपणा देखायीस. दुयीनन् बचीकुची शिकार खायीन अना झाळखाल्या सावलीमा सोय गया. पूरी शिकार एकट् टिंगाला मिलेलक टिंगा आपल् हुशारीपर मनक् मनमा खुश भयेव.

असाच एक एक रोज सामने सरकत होता. चिंगाला फसायस्यान टिंगा शिकार खायलेत होतो. चिंगाला उल्लु बनावनकी एकबी संधी वू सोळत नोहतो. पर चिंगा आपल् भोल् स्वभावलक हरबार फसायव जात होतो. असोच एकबार वूनन् दुयी मिलस्यान शिकार करीन. उनारोका दिवस रयेलक वूनला तहान लगीती. पाणी पायस्यान शिकार खानको दुयीनन् ठरायीन. टिंगान् गये बेरा सारको चिंगाला फसावनक् हेतूलक चिंगाला तरापर पाणी पिवनला धाळीस. अना खुद शिकार राखतु बसेव. भूक लगी रयेलक शिकार देखस्यान वोक् तोंडला पाणी सुटेव. वू गये बेरा सारको एकटोनच शिकार खानको सोचतच होतो. वोतरोमा बागको गुर्रानको आवाज आयकस्यान टिंगाला घाम फुटेव. बाघ आपलंकन आवता देख टिंगा घबरायस्यान शिकार झाळखाल्याच सोळस्यान जंगलमा पराय गयेव. घटकाभरमाच बाग झाळखाल्या पोवचेव.वोन् झाळखाल्या पळी शिकार देखीस. पर पोट भरेव रयेलक वोन् शिकारको बासबी नही लेयीस. अना वू पाणीपिवन तराकन निकल गयेव.
इत् पाणी पियस्यान चिंगा झाळखाल्या आयस्यान देखसेत् शिकार जसीकी तसी पळी ! वोला अचंबा भयेव. टिंगाबी झाळखाल्या नोहतो. वोन् घळीभर टिंगाला हाका मारीस पर टिंगाको काहीच पत्ता नही लगेव. आखरीमा नाईलाजलक चिंगा एकटोच शिकार खान बसेव. पोट भरेपर वू वहानच सोय गयेव. चिंगाकी झोप पूरी होयेपर बागक् भेवलक परानेव भूको प्यासो टिंगा वहान आयेव. पर तबंवरी शिकार सरस्यान बच्याता सिर्फ हाळाच !