अळी आणि पान (कविता)
अळी आणि पान
कवयित्रीः सौ.कविता काळवीट । चित्रः आभा भागवत
टिप: आभाताईंनी या 'घरात बंद' सुट्टीत एक चित्रांचा उपक्रम सुरू केला आहे. त्यात आभाताईंनी काढलेले एक चित्र बघून कवयित्रीला ही बालकविता स्फुरली. सोबत ते चित्र दिले आहे.(परवानगीसाठी आभाताईंचे आभार) आणखी अशाच चित्रांच्या कृती आभाताईंच्या या फेसबुक पानावर बघता येईल.
स्वतः कवयित्रीने चितारलेले चित्र कवितेच्याखाली देत आहोत
बघा माझे चित्र कसं,
छान छान छान
एकआड काढले,
अळी आणि पान
पानावर आहेत बघा,
खूप खूप शीरा
कंबर वाकडी करून,
अळी दाखवी नखरा
एकटंच पान जमिनीवर,
पडून कसे लोळे
अळी पहाते माझ्याकडे,
वटारून डोळे
सुंदर रंग देऊन
मीही बनले/लो रंगारी
किती मजा आली
मला आजच्या दुपारी
या उपक्रमात कवयित्रीने चितारलेले चित्र: