आपण यांना पाहिलंय का? - भाग १४

छोट्या मित्रमैत्रिणींनो,

'आपण यांना पाहिलं का?' या धाग्यावर आपण अनेक छायाचित्रे बघणार आहोत. या फोटोंमध्ये दिसणारी मंडळी, तुम्हाला तुमच्या अवतीभोवती दिसण्याची दाट शक्यता आहे, किंवा तुम्ही त्यांना आधी पाहिलेही असेल. भारतीय शहरांत/गावात सहज दिसणारे पक्षी, कीटक इत्यादी मंडळींचे फोटो इथे तुम्ही बघाल. फोटो बघून तुम्ही ओळखायचं आहे की हा फोटो कोणाचा आहे ते. तुमचा अंदाज बरोबर आहे का, हे तुम्हाला सोबत असलेल्या ऑडियो क्लिपवरून कळेलच. त्या ऑडियो क्लिपमध्ये त्या जीवाबद्दल छानशी माहितीही थोडक्यात दिलेली असेल. 

चला तर सांगा.. आपण यांना पाहिलंय का?


या भागातील छायाचित्रं टिपली आहेत, 'मितेश सरवणकर' यांनी.

बघा बरं हा जीव ओळखू येतोय का? तुम्ही कुठेही रहात असा शहरात किंवा गावात हा जीव तिथे नक्की असेल. तुम्ही तो पाहिलाय का?

 

 

आता हे छायाचित्र बघा. हा पक्षी तोच आहे का वेगळा आहे?

आणि आता हे पुढले दोन फोटो बघा. हा पक्षी वरील दोन्ही पेक्षा वेगळा आहे का तोच आहे? नीट बघा हं

 काय ओळखला का हे पक्षी? तुम्ही ओळखला असेल किंवा नसेल, त्याबद्दल माहिती ऐकायला तुम्हाला आवडेलच.

पक्ष्याच्या माहितीसाठी पुढील चौकटीतल्या 'प्ले' (आडवा त्रिकोण) बटणावर क्लिक करा:

 

याआधीच्या भागात : भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८ | भाग ९ | भाग १० | भाग ११ | भाग १२ | भाग १३