मी नही जाय! (पोवारी बालकथा)

मी नही जाय!
लेखनः गुलाब बिसेन
चित्रंः रसिका

रातका नव बज्याता. रातको जेवण होयस्यान अजी - माय, बाबुजी अना जितू मोठांगं रामायण देखत होता. राखी सोफापर बसस्यान किताब बाचत होती. राखीकी आई सैपाक खोलीमा बरतन भांडा संची करत होती. जितू टिव्हीकं जास्तच जवर बसेतो. वोला जवर बसे बिगर टिव्हीच देखेसारखी नोहती लगत.
वोला टिव्हीपासना दूर बसावन साती खाटपर बसेव अजीनं अवाज देयी, "जितू, हुचकी लगी बेटा. लायनांगक गिलासभर पानी आणदेभरा." अगाज आयकस्यानबी जितू टसका मस नही भयेव. अजीनं दुसरंबार अगाज देयीस. दुसरं बारबी जितू ज्यानकं वाहान. जितूला असो टिव्हीमा खुपसेव देख राखीला रयस्यान नही भयेव.
"जायनारे जितू, अजीसाठी पानी आनजो."
"मी नही. जाय तूच." जितूको तोंड खुलेव. तसी हातमाकी किताब सोफापर ठेयस्यान राखी लायनांगं गयी अना गिलासभर पानी लेयस्यान आयी.
दुसरं रोज आई गाय ढोरको शेणपुंजा करत होती. पुंजाको वळगा उचलता उचलता डोस्कापरको चुंबर खाल्या पळेव. आईला उचलता नोहतो जमत. जितू सपरीपरच चित्र हेळत बसेतो.


"जितू, या चुंबर डोयीपर ठेव भरागा." आई खाल्या बगत बोली.
"मी नही जाय." जितू सपरीपरलकच बोंबलेव.
आईला तकलीफमा देख राखी परात गयी अना पळी चुंबर उचलत आईकं डोयीपर ठेयीस.
जितू रोजकं रोज "मी नही जाय!" को फाळा बाचतच होतो. येनं फाळालक घरभरकं जीवला चिंता पळी. हेबान दे तं नहान बच्चा से. येनच बिचारलक वोला कोणीच काही नोहतो कवत.

दिनकं दिन जितूको "मी नही जाय !" को फाळा बाचनो बढनच बसेव. वू कम होनको काही नावच नोहतो लेत. एकरोज राखी शाळाको अभ्यास करत होती. जितूबी संगमाच बसेतो. अभ्यास करता करता जितू इतं वूतं काजक तरी ढुंढण बसेव.
"राखी दिदी, मोला तोरो पेन देना." राखीला वोकं फाळा बाचनको पयलेच तरास आयेतो. वोला येव साजरो मौका मिलेव.
"मी नही जाय! एकच पेन से मोरंजवर." राखी डोरा मोठा करस्यान बोली. जितू बसेव आपलो चूप. उठस्यान घरमा गयेव. अना दुसरो पेन मिलंसेकातं ढुंढण बसेव.
पेन ढुंढशान वू परेशान भयगयेव.


"परंकोरोज येनसतं फूलमा ठेयेतो मी पेन!" जितू खुदलाच कवन बसेव. ढुंढ ढुंढके थकेपर वू आपलं बाबूजीजवर गयेव. बाबूजी धान कटाईको हिसाब करत होता.
"बाबूजी, मोला तुमरो पेन देवना."
"मी नही जाय. मोरो हिसाब चल रही से. मोरो हिसाब होयेपर मिले." बाबूजी बोल्या. बाबूजी जवरबी वोकी काही नही चलेपर वोनं घरमा इतंवूतं देखीस. माय बाळीमा वाफामाकी भाजी तोळत होती. मायजवर काही पेन नही रवं. मंग वू आईला देखन बसेव. आई भारटपरकी भीसकी बळी हेळत होती. आईजवरबी पेन रवनकी गुंजाईस नोहती. आखीरमा वोला अजी दिस्या. अजी भारासाती बंध बिंधत होता. वोनं अजीजवर बहुतबार पेन देखी होतीस.
"अजी अजी, मोला तुमरंजवरको पेन देवना."
"मी नही जाय! मी आबं काममा सेव." अजी बोलेव. जितू नहानसो टोंड करस्यान राखीजवर जायस्यान बसेव.
"मिलेव का पेन ?" जितूको नहानसो टोंड देखस्यान राखी बोली.
"नही."
"आता?"
"मी समझ गयेव."
"का?"
"अज पासून मी नही जाय को फाळा बंद."
दुयीजन एकमेकन देखस्यान गालकुं गालमा हासन बस्या. राखीनं कंपास खोलस्यान दुसरो पेन हेळीस. आता दुयीजन अभ्यान करनोमा गुंग भय गया.