मिशाचोर (कवितावाचन)

हॅल्लो मित्रमैत्रीणींनो,
'आबोल ताबोल' हा तुमच्या बंगालमधील मित्रमैत्रीणींचा एक अतिशय आवडता कवितासंग्रह आहे. सुकुमार राय यांच्या कविता आजही बंगाली शाळांतील मुलं मोठ्या आवडीने म्हणतात. त्यापैकी एका कवितेचा अनुवाद आपण इथे प्रकाशित केला होता आठवतो आहे? प्राची देशपांडे यांनी तो अनुवाद केला होता.
(तो अनुवाद इथे वाचता येईल)

मुळातील बंगाली कविता म्हणण्याची एक खास ढब आहे. ती तुमच्यापर्यंत कशी पोचवायची हा प्रश्न आपल्या कलकत्त्यातील एका मित्राने सोडवला आहे. कलकत्त्याच्या पाठ भवन शाळेदुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या माघदत्त बॅनर्जी याने मूळ बंगाली कविता रेकॉर्ड करून दिलीच, त्याच सोबत मराठी अनुवादही पाठ करून रेकॉर्ड करून पाठवला आहे. आम्हाला खात्री आहे तुम्ही दोन्ही ऐकायला/पहायला उत्सुक आहात.

चला तर ऐकूयात मूळ बंगाली कविता आणि मराठी अनुवाद.

मूळ बंगाली कविता:

मराठी अनुवाद:

 

(चित्र: दिव्या गवासने)