नीना आणि मांजर (व्हिडीओ)

नीना आणि मांजर
पपेट्स आणि चित्रे: मल्हार (इयत्ता दुसरी, अक्षरनंदन), अमृता | आवाज: अमृता | लाइट्स चित्रीकरण आणि संकलन: विशाल

 

आज जागतिक रंगभूमी दिवस. रंगभूमी म्हटलं की केवळ अभिनय, नाटक इतकाच सीमित अर्थ नसून त्याहून बरंच काही त्यात सामावलं आहे. आज आपला दुसरीत शिकणारा एक मित्र मल्हार याने आईबाबांच्या मदतीने आठवडाभर काम करून छान चित्रं आणि पपेटच नाही तर पूर्ण रंगमंच उभारला आहे. गावागावांत पूर्वी एक फिरता चिमुकला सिनेमा असायचा. एका लहानशा भोकातून डोकावून आत चालणारी फिल्म बघायची असे - त्याला बायोस्कोप म्हणतात. हा चिमुकला रंगमंचसुद्धा त्याच धर्तीवर उभा केला आहे. नि त्यावर घडणारी गोष्टही तितकीच मजेशीर आहे. चला तर ऐकूया या अनोख्या रंगमंचावर घडणारी छानदार गोष्ट.

 मूळ लेखन: फातिमा शराफेद्दिन | अनुवाद: अजित पेंडसे | मूळ चित्रे: व्हिन्सेंट हार्डी (ज्योत्स्ना प्रकाशन)