पतंगपत्र (कविता)

पतंगपत्र

कवी: फारूक एस.काझी 'समीर'
चित्र: माधवी शिंगाडे, इयत्ता पाचवी, 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गौडवाडी, ता.सांगोला, जि. सोलापूर


.......................................

पतंग बनवू, पतंग उडवू
या रे या ! सारे या !
आकाशाची सैर करू,
या रे या ! सारे या !

घेऊ निळाई आभाळाची
रंग सोनेरी सूर्याचा.
बांबूची काठ-कामठी
शेपटी पिसारा मोराचा !

झाडाकडून डींक घेऊ,
वाऱ्याचे वारू जोडू.
जोडू स्वप्नांची दोरी,
त्यात चंद्र-तारका माळू.

संक्रांतीच्या शुभकामना
पतंगावर लिहू या.
एक पतंगपत्र आपुले,
आकाशाला धाडू या...!