रेनकोट (पोवारी कथा)

रेनकोट
लेखक - गुलाब बिसेन, कोल्हापूर
चित्रे: फारूक एस. काझी

रजत सकारपासूनच पप्पाकं मंग लगेव होतो. “पप्पा, मोला शाळासाठी सॅक, शूज अना रेनकोट अजकं अज लेय देव.”
“पर गये सालकी स्कूलबॅग अना रेनकोटतं साजरोच से बेटा.”
“नही. मोला नवोच पायजे. मोरा दोस्तबी नविन रेनकोट, स्कूल बॅग लेनार सेत?”
“बेटा, रेनकोट नवो जुनो देखस्यान नही वापरी जाय. वू खराब से का साजरो से येवत देखे पायजे.” पप्पा समजावनकं सूरमा कवन बस्या.
“मी नही. मोला नवोच पायजे. मोन्यानत् गये ईतवार लेयबी लेयीस.”


पप्पाकं बहुत समजावनोपरबी रजत माननला तयार नही रहेलक. पप्पा रजतसाती स्कूलबॅग अना रेनकोट खरेदीला तयार भया. ईतवार रहेलक वूनलाबी सुट्टीच होती. पप्पाकं संगं गाडीमा बसस्यान रजत बजारमा गयेव.


बजारमा स्कूलबॅग, रेनकोट, छत्री, वही, पुस्तकंयीनलक दुकान सज्या होता. रंगबिरंगी स्कूलबॅग, रेनकोटपरका कार्टुनका चित्र टुरूपोटुयीनला आकर्षीत करत होता. तसी बजारमा चहलपहल होती. ईतवार रहेलक टुरूपोटुयीनकी शाळाकी खरेदी जोरसोरलक सुरू होती. रजतबी पप्पासंगं ओरखीवालं दुकानमा गयेव. रजतला रेनकोट लेता देख दुकानदारबी कवन बसेव, “रजत, गयेसालको रेनकोट फाट गयेव का?”


रजत काहीच न बोलता, दुकानदारकं बोलनोकन दूर्लक्ष करत, रेनकोट पसंद करन बसेव. घळीभरमा आपलं पसंदको रेनकोट अना स्कूलबॅग लेयकनच वू बाहर आयेव.

मनपसंद खरेदीलक रजत खुस होतो. दुयीजन गाडीमा बस्या अना घरकं रस्ताला लग्या. घरं जाताजाता मम्मीनं भाजीसाती फणस सांगीतीस, मुहुन पप्पानं गाडी भाजी बजारमा पलटाईस. भाजी बजारमा एक टुराजवर ताजा ताजा हिरवा फणस होता. पप्पा गाडीमालक उतरस्यान फणस लेन बस्या. रजत गाडीमाच बसेव होतो. अचानक रजतकी नजर फणसवालं टुरापर पळी. फणसवालं टुराकीबी नजर रजतपर पळी. तसो वू टुरा खाल्या मान टाकस्यान आपलो टोंड लुकावत फणस कापन बसेव. फणस लेयस्यान वय निकल्या. गाडीमा बसेव रजत वनं टुराको बिचार करन बसेव. वोला ख्याल आयी. वू फणसवालो टुरा वकंच वर्गमा सिकनेवालो बिट्टू होतो.

दुय रोजमा शाळा सुरू भयी. सब टुरूपोटु रंगीबेरंगी छत्री, रेनको, स्कूलबॅग धरस्यान शाळामा आया. नवो वर्ग, नवो बेंच, नवा वर्गशिक्षक येनं कारनलक वर्गमाको वातावरण फूर्तीवालो होतो.

उनारोकं सुट्टीमा गावगवतरला गया टुरूपोटु बातचीत, दंगामस्तीमा दंग होता. रजतबी सोन्या, विजू, गोलूसंगमा उनारोकं गावगवतरकं चर्चामा गुंग होतो. बाहर बरसातको छिळकावबी सुरू होतो. असोमा एकाएक रजतकी नजर बिट्टुपर पळी. अर्धो आंग फिजेव. जूनं छत्रीमालकबी पाणी अंदर आवत होतो. तसो रजत आपलं जागापरलक उठस्यान वोकंजवर गयेव. रजतला देख बिट्टू वोकंकन ख्याल नही रहेसारखो करन बसेव.
“ये बिट्टू, तु काल बजारमा फणस बिकत होतोस ना?” रजतनं सिधो बिट्टूला बिचारीस. सबकं पुळं बिट्टूला सरमायेसारखो लगेव.
“हव.” बिट्टू धिरूलकच बोलेव.
“तू, भाजी बिक्याको टुरा आस?” रजत चिळावनकं मूडमा खोदखोदस्यान बिचारन बसेव.
“हव. मोरा बाबुजी आमरं खेतमाकी भाजी बिकंसेत. मी बी कबी कबी बसजासू दुकानमा.”
“पर काल तु त् दुकानमा नोहतो बसेस?”
आता रजतला खोदखोदस्यान बिचारता देख बिट्टू परेस्यान भयेव.
"मोला यंदा नवो रेनकोट पायजे होतो. मी पप्पाला सांगेव. तं पप्पानं कहीन, आपलं झाळकी फणस बिक. फणस बिकस्यान रेनकोट लेता आये येतरा पैसा जमाव. मुहून मी च्यार पाच रोज भया फणस बिकुसू.” बिट्टूनं एक दममा सांग देयीस.
“मंग लेयेस का रेनकोट?”
“नही. आबं पूरा पैसा जमनला सेती.”
रजत जागापरा जायस्यान बसेव. बसेव बसेव वू बिचारमा पळेव. “मी गयेसालको रेनकोट नवोच रयकेबी नविन रेनकोट लेयेव. अना बिट्टूला एक रेनकोट लेनला बजारमा बसस्यान फणस बिकनो लगं से.” वोला बहूत दुख भयेव.

पयलं रोजकी स्याळा सुटेपर रजत घरं आयेव. दफ्तर ठेयस्यान काहीतबी ढूंढन बसेव. रजतला काहीतबी ढुंढता देख मम्मी कवन बसी, “का ढुंढसेस रजत?”
“मम्मी, मोरो गयेसालको रेनकोट.”
“तोरो नवो रेनकोटत् सेना. मंग जूनो कायला पायजे आता?”, मम्मी बिचारन बसी.
"दे ना मम्मी. काम से एक." मम्मीला काहीच नही समजेव. वोनं लाॅफ्टपरलक बॅगमा ठेयेव रेनकोट हेळदेयीस.
दुसरं रोज रजत नवो रेनकोट शाळामा धरस्यान गयेव. शाळामा वू बिट्टूकं आवनकी बाट देखन होतो. बिट्टू शाळामा आयेपर वोनं यंदाको नवो रेनकोट बिट्टूकं सामने धरीस. “बिट्टू, येव तोला मोरंकनलक नवो रेनकोट. आता तू दुसरो रेनकोट लेवू नोको. फणस बिकस्यान जम्या पैसा तोरं गल्लामा टाक.”
“नही, नही. मी रेनकोटसाती पैसा जमा कर रही सेव. अदिक दुय तीन रोजमा मोरा पैसा जम जायेत.”

“अरे, दुयच रोज भया लेयीसेव. येकी घडीबी नही मुळीसे. नवोकोरोच से. दोस्तकनलक गिफ्ट त् लेय सिकंसेसना!”

रजतन् बहू आग्रह करीस पर बिट्टूनं रजतको रेनकोट नही धरीस. आखीर रजतकोच नाईलाज भयेव. वोनं बिट्टूसाती आनेव नवो रेनकोट तसोच दफ्तरमा ठेयीस.

उदास चेहरालक रजत घरं आयेव. रातवा वोनं पूरी कहाणी मम्मी पप्पाला सांगिस. तब् वूनला रजतको अभिमान लगेव. “पप्पाजी, मोरो नवो रेनकोट दुकानदारला वापस करदेव. नही पायजे मोला दुय दुय रेनकोट. मी जुनोच रेनकोट टाकून.” रजतन् आपलं मनकी बात पप्पाला सांग देयीस. दुसरं रोज पप्पान् रजतको नवो रेनकोट दुकानदारला वापस करीन.

दुय तीन रोज असाच निकल गया. बिट्टू रोज फाटे छत्रीमा आवत होतो. कबी शर्ट फिजेव त् कबी पॅंट फिजी रव्. पर रजताला काहीच करता नही आयव येको दुख होतो. एकरोज शाळाकं गेटपर रजत रिक्षामालक उतरत होतो. वोतरोमा वोकी नजर शाळामा पैदल आवता टुरूयीनपर पळी. वूनकंमा एक टुरा नवोकोरो रेनकोट टाकेव मज्यामा आवत होतो. वोन् गेटपरच वोला रोकीस त् वू नवो रेनकोटवालो टुरा बिट्टू होतो. रजत बहुत खुश भयेव.


“बिट्टु, कबं लेयेस रेनकोट?” रजत बिचारन बसेव.
“कालच लेयेव. कसो से मोरो नवो रेनकोट?”
“बहुत बढिया.” असो कवत रजतन् वोको हात आपलं हातमा धरीस अना दुयीजन हासत खिदळात गेटमालक ओरांडत शाळामा गया.