भातशेती (व्हिडियो)

भातशेती
माहिती सांगताहेतः भाऊसाहेब चासकर | चित्रीकरणः अगस्ती चासकर


पाऊस येतो. ताल धरतो. ओढे नाले वाहू लागतात. भात खाचरं तुडुंब होतात. मेघ बरसू लागले की भंडारदरा परिसरातल्या डोंगर उताराच्या खाचरांमध्ये 'चिखलणी' आणि 'आवणी'ची लगबग सुरू होते. भाताची रोपं तयार झालेली असतात. भाताच्या रोपांची जुड असते तिला मुठ म्हणतात. अलीकडे आदिवासी शेतकरी अत्यंत आधुनिक तंत्राने आवणी, भातशेती करत आहेत. पाऊस कोसळतोय, फुटभर चिखल आहे, गारठा असतो जोडीला. चिखलात उतरून आवणी करताना अनुभव घेतला. हे किती कष्टाचे काम आहे हेही कळलं. दिवसभर आवणी करताना कंबरडं मोडून जातं. या व्हिडीयोत तुम्हाला ही प्रक्रीया कशी असते हे तर समजेलच.
त्याचबरोबर आवणी, चिखलणी, खाचरं, इरलं असे शब्दही ऐकू येतील. यातील काहींचे अर्थ तुम्हाला माहित नसतील तर आपल्या आईबाबांना, ताईदादांना जरूर विचारा.