शुष्की (लघुपट)

शुष्की (लघुपट)

श्रेयनामावलीः
लेखन आणि दिग्दर्शन: सुमुखी शेजवलकर । नील अर्चिस मनीष

D. O. P. : नील अर्चिस मनीष

संकलन: शाल्मली शिरोडकर । सुमुखी शेजवलकर

कलाकार:  रेवा क्षेमकल्याणी | जुई सप्तर्षि । नील अर्चिस मनीष । मल्हार देडगे । मल्हार पेंडसे । सुमुखी शेजवलकर 
{सर्व विद्यार्थी: इयत्ता आठवी (अक्षरनंदन शाळा, पुणे)}
। चिन्मय पारखी । सुखदा भावे 

संपूर्ण पृथ्वीवर जवळजवळ एका वर्षापूर्वी कोरोना पसरला आणि त्यानंतर आपण बरंच काही सोसलं. माणसांच्या जगात कोरोना आला, तसा वनस्पतींच्या जगातही एका 'शुष्की' नावाच्या विषाणूने ठाण मांडलंय आणि तो आता सबंध वृक्षजातीत पसरलाय. वृक्षांच्या शाळा ऑनलाईन चालू आहेत आणि त्यांनाही या सगळ्याचा खूप कंटाळा येतोय. ते त्यांच्याकडची परिस्थिती एकमेकांसमोर मांडतायत, अफवा आणि चुकीच्या समजांविषयी बोलतायत या लघुपटात, ज्याचं नाव आहे 'शुष्की'. बघूयात, ते या विषाणूशी कसा सामना करतायत ते!

हा लघुपट आवडला असेल, तर या मुलांनी सुरू लेलेल्या या चॅनलला लाईक करा, तुम्हाला काय वाटलं ते खाली कमेंट्समधून कळवा, आपल्या नातेवाईकांना आणि दोस्तमंडळींना दाखवा.