सुट्टीतील धमाल: परी आणि राजकन्या (गोष्ट)

 परी आणि राजकन्या 
लेखनः अद्विता कर्णिक । चित्रेः सई दाभोळकर 
(इयत्ता २री, अक्षरनंदन)

 

एक होती राजकन्या. ती रानपूर नावाच्या शहरात राहायची.

ती जवळजवळ बारा वर्षांची होती, तिला टेकडीवर जायला खूप आवडायचं.

एकदा संध्याकाळी ती टेकडी चढायला गेली. तिनी टेकडीवर पाय ठेवला तोच निळसर जांभळा प्रकाश दिसला.

 

त्याबरोबर अकाशातून एक परी आली. परीनी विचारलं, "माझं नाव मुनमुन, तुझं?"

राजकन्या म्हणाली "माझं नाव सई".

परी म्हणाली, "तुला अंजीर खायला आवडतं?"

राजकन्या म्हणाली "होSSS".

परी म्हणाली, "या टेकडीवर आहे त्याचं झाड, चल आपण जाऊया"

शेवटी त्या दोघी तिथे पोचल्या. राजकन्या एक अंजीर तोडायला गेली.

परी म्हणाली, "अगं, ते पिकलं नाहीये, ते पिकलंय" असं म्हणत परीने दुसऱ्या अंजीराकडे बोट दाखवलं.

राजकन्येनी विचारलं, "तुला कसं कळलं?"

परी म्हणाली, "मला लगेच कळतं".

मग राजकन्येनी पिकलेलं अंजीर तोडलं आणि खाल्लं. मग त्या दोघी आनंदाने घरी गेल्या. 

 ---------------
(टंकन करायला मदत केल्याबद्दल उदय क्षीरसागर यांचे आभार)

=============

'सुट्टीतील धमाल'बद्द्ल मॉनिटर उवाच:

मुलांनो, आता तुम्हाला सुट्टी लागली असेल ना किंवा करोनाची साथ असल्याने शहाण्यासारखे तुम्ही घरातच बसून असाल. मग तुम्ही या सुट्टीत काय करताय हे इतरांबरोबर शेअर कराल का? तुम्ही एखादी गोष्ट लिहिली असेल, कविता लिहिली असेल किंवा घरबसल्या काही मजेशीर खेळ खेळला असाल, छानसं चित्र काढलं असेल किंवा तुमच्यासोबत करोनामुळे घरातच असणाऱ्या आईबाबा किंवा आजीआजोबांसोबत काहीतरी भारी उपक्रम/खेळ खेळत असाल, एखादा पदार्थ शिकला असाल तर आम्हालाही नक्की सांगा. तुम्ही खेळताय त्या खेळाचा/कृतीचा व्हिडियो आम्हाला पाठवलात तरी चालेल! जे काय कराल ते मात्र घरातच करता येण्याजोगे हवे. या "सुट्टीतील धमाल" नावाच्या सदरामध्ये अश्या गोष्टी सुट्या किंवा एकत्र करून आम्ही प्रकाशित करू. मग त्या तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा वाचता/बघता येतील!

आम्हाला तुमचं लेखन/कृती पाठवायचा पत्ता आहे - monitor.atakmatak@gmail.com