सुट्टीतील धमाल ३ - घरातच थांबा (व्हिडिओ)

घरातच थांबा

लेखन व व्हिडियो: तनिश कालगुडे
वय १३ वर्षे, इयत्ता ७वी

मी तनिश कालगुडे. मी पुण्याचा आहे आणि सध्या नेदरलँड्सच्या अॅम्सटरडॅममध्ये राहत आहे. युरोपमधील COVID-19 परिस्थितीमुळे बाहेर न जाता घरी आठवड्यापेक्षा जास्त वेळ घालवल्यानंतर, मला समजले की घरी राहून साखळी तोडणे किती आवश्यक आहे. माझ्या वयोगटातील मुलांना या काळात घरी राहण्यासाठी आणि सर्जनशील गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनविला आहे.

मला व्हिडिओ बनविणे आवडते आणि मला YouTube वर व्हिडिओ पोस्ट करायचे होते. माझ्या बाबांनी या विषयावर व्हिडिओ करण्याची कल्पना सुचवली. मी माझ्या याबद्दलच्या कल्पना एका कागदावर लिहून काढल्या आणि मग कथानक (story line) तयार केली.

मी ऑडियोसाठी 'मिले सूर मेरा तुम्हारा' हे गाणं निवडलं. नंतर घरातच आमचे व्हिडिओ शूट केले. लागणाऱ्या इमेजेस मिळवल्या. सगळं लागणारं साहित्य मला मिळाले होते. मी नंतर त्यांना VSDC ह्या सॉफ्टवेअर नी edit केले. आई-बाबांसोबत चर्चा करून मी थोडे बदल केले. अश्या प्रकारे माझा पहिला विडिओ तयार झाला. या संपूर्ण प्रक्रियेस मला दहा तासापेक्षा जास्त वेळ लागला. आम्ही सगळ्यांनी हे खूप एन्जॉय केले.

 

==============================

'सुट्टीतील धमाल'बद्द्ल मॉनिटर उवाच:

मुलांनो, आता तुम्हाला सुट्टी लागली असेल ना किंवा करोनाची साथ असल्याने शहाण्यासारखे तुम्ही घरातच बसून असाल. मग तुम्ही या सुट्टीत काय करताय हे इतरांबरोबर शेअर कराल का? तुम्ही एखादी गोष्ट लिहिली असेल, कविता लिहिली असेल किंवा घरबसल्या काही मजेशीर खेळ खेळला असाल, छानसं चित्र काढलं असेल किंवा तुमच्यासोबत करोनामुळे घरातच असणाऱ्या आईबाबा किंवा आजीआजोबांसोबत काहीतरी भारी उपक्रम/खेळ खेळत असाल, एखादा पदार्थ शिकला असाल तर आम्हालाही नक्की सांगा. तुम्ही खेळताय त्या खेळाचा/कृतीचा व्हिडियो आम्हाला पाठवलात तरी चालेल! जे काय कराल ते मात्र घरातच करता येण्याजोगे हवे. या "सुट्टीतील धमाल" नावाच्या सदरामध्ये अश्या गोष्टी सुट्या किंवा एकत्र करून आम्ही प्रकाशित करू. मग त्या तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा वाचता/बघता येतील!

आम्हाला तुमचं लेखन/कृती पाठवायचा पत्ता आहे - monitor.atakmatak@gmail.com