कुल्फी कुठे मिळेल?

वर्षभराची नोंदणी:

१. येत्या वर्षातील तीनही अंकांची (दिवाळी'२३, उन्हाळी'२४, पावसाळी'२४) एकत्रित सवलतीत नोंदणी करायची असेल तर पुढील फॉर्म भरून नोंदणी करता येईल. 

https://forms.gle/x7u3HgoNhbqUSqgg6

२. केवळ दिवाळी अंक हवा असेल तर तो पुढील दुकानांत उपलब्ध आहे. शिवाय अमेझॉन आणि अक्षरधाराच्या वेबसाइटवरही अंक उपलब्ध आहे.

अटकमटक गोष्टी

गोष्टी वाचण्याबरोबर मुलांना गोष्टी ऐकायलाही खूप आवडतात, हे लक्षात घेऊन 'अटकमटक'तर्फे मुलांना गोष्टी ऑनलाइन सांगण्याचा उपक्रम सुरू करत आहोत.
यात येत्या वर्षात गोष्टींची ऑनलाइन 10 सत्रे होतील.

ही सत्रे कुल्फीचे संपादक ऋषिकेश दाभोळकर घेतील.
तुम्ही नोंदणी केल्यास तुम्हांला कुल्फीच्या तीन अंकाचे सब्स्क्रिप्शनही मिळणार आहे. जर आधीच कुल्फी आधीच नोंदवला असेल, तर तुम्हांला तो खर्च वजा करून उरलेले पैसे भरून नोंदणी करता येईल.
पुढील लिंक वापरून याची नोंदणी करा
https://forms.gle/AmA7M2rRXGt3sNkz5

डोनेट कुल्फी 

तुम्ही कुल्फीचा दर्जा, धडपड गेले तीन अंक अनुभवता आहात. कसदार साहित्य, चित्र आणि अंकाच्या डिझाईनमुळे हे शक्य होतं. अशी दर्जेदार निर्मितीमूल्य असलेला अंक काढण्यासाठी अंकांची काही एक किंमत ठेवणंही अपरिहार्य ठरतं.
पण म्हणून मिळकत कमी असणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी 'कुल्फी' नाही का? तसं अजिबात नाही. या मुलांपर्यंत पोचायला आम्हांला तुमची मदत हवी आहे.
Donate कुल्फी : https://forms.gle/77xot8xc8nRg2mxf6