तृतीय क्रमांक (विभागून) विजेती एकांकीका: Act 1972

Act 1972

लेखक: तेजस कुलकर्णी

(पडदा उघडतो. रंगमंचाच्या एका भागात स्पृहा बिल्डिंगच्या टेरेसच्या कठड्यावरून चालतेय. आणि रंगमंचाच्या दुसऱ्या भागात तिचे मित्र मैत्रिणी तिला प्रोत्साहन देतायत. आणि तो टास्क ती पूर्ण करते सगळे तिला भेटायला येतात. स्पृहा तिच्या मैत्रिणीला.)

स्पृहा: आता कळलं ना?मी कशालाच घाबरत नाही ते. चल काढ आता १०० रुपये.
मुलगी: हे घे.

(हळूहळू सगळे उद्या भेटू वगरे म्हणून निघून जातात. त्याच घोळक्यातून मिथिला समोर येते.)

मिथिला: तुला अक्कल आह का गं?
स्पृहा:    काय झालं
मिथिला: काय गरज होती हे असले टास्क करण्याची?
स्पृहा:    ती मूर्ख पूजा मला सांगत होती कि तू जर कशाला घाबरत नसशील तर टेरेसच्या कठड्यावरून चालून  दाखव. (हसते)
मिथिला:  तिने म्हटलं आणि तू करून दाखवलंस लोक सांगतील उद्या आगीत उडी मार, तू दाखवणारेस का मारून?
स्पृहा:      ए तू माझी आई बनू नकोस
मिथिला:  समजा आपल्या बिल्डिंगच्या वॉचमन ने हा उपद्व्याप करताना तुला बघितलं असत आणि तुझ्य आईबाबांना Inform केलं असत तर?
स्पृहा:     ए वेडे म्हणून तर टेरेसची बॅकसाईड निवडली ना..बरं तो इतकं काम करतो ना कि कधीच त्या खुर्चीतून उठत नाही.
मिथिला: हे बघ स्वतःच कस बरोबर आहे हे मला सांगू नकोस. तुझा तोल गेला असता तर किंवा पाय घसरला असता आणि कायमच हॅंडीकॅप  झाली असतीस तर, तुला नसेल एक स्वतःची काळजी but atleast think about your mom and dad
स्पृहा:    तू तूझ्या वयाप्रमाणे का नाही वागत गं?आणि हो मला माझी काळजी घेता येते.
मिथिला: तुझं ना Luck चांगलं आहे
स्पृहा:     मिथिला please तू मला lecture देऊ नकोस, आपण आता लहान नाही आहोत atleast मी तरी. Ok common आपण आता 9th मध्ये आहोत गं
मिथिला: तेच म्हणतेय मी आपण फक्त 9th  मध्ये आहोत आपण खूप मोठे नाही झालोय, तुला भीतीच नाही वाटत कशाची?
स्पृहा:     तुझं काय म्हणणं आहे.. कि तुझ्यासारखं राहायचं मग हे नको. ते नको. हे केल्यावर असं झालं, तर ते केल्यावर तस होईल
मिथिला:  bye! I am leaving…
स्पृहा:      ए थांब I am sorry  मला तस नव्हतं म्हणायचं (मिथिला तिला ignore करते) ok मी परत असं नाही वागणार नक्की
मिथिला:  ठीके सोड आता..   बघू पुढच्यावेळेला
स्पृहा:     आता सोड ना राग यार
मिथिला:  its ok
स्पृहा:     ए चल समोरच्या hotel मध्ये जाऊ खूप भूक लागलेय..आई पण आज घरी नाहीए आणि आई ने सांगितलंय कि Hotel मधेच खा म्हणून.

BLACKOUT

(मिथिला आणि स्पृहा एका Hotel मध्ये बसल्यात) बाकी Hotel मध्ये लोकांची वर्दळ

स्पृहा:    तू काय घेणार?

मिथिला: मला काही नको?

स्पृहा:     अगं पैसे मी देणार आहे

मिथिला:  तू काय घेणार?

स्पृहा:      मी काय घेणार यावर तूझी आवड  ठरणार आहे का?

मिथिला: अगं तस नाही मी तुझ्यातलंच थोडं खाल्ल असतं ना घरी आईने जेवण केलंच असेल

स्पृहा:     अगं मग एक दिवस कमी जेव किंवा नकोच जेवूस.. बरं मी Chainese खाणार आहे, तू पण खाशील ना?

मिथिला:  नाही नको मला खा तू

स्पृहा:     का? बरं सलॅड खाशील मग?

मिथिला:   हो (सृहा कपाळावर हात मारून घेते)

स्पृहा:      Excuse me    

वेटर:        Yes

स्पृहा:     One शेजवान नूडल्स

वेटर:     अजून काही

स्पृहा:     (मिथिलाकडे बघून तिची Order सांगायला जाते पण मिथिला नकार खुणावते) नाही नको

मिथिला:   एवढे नूडल्स एकटीला जाणार नाहीएत उगाच वाया जाईल

स्पृहा:      जाईल तेवढे खाईन उरलेले Parcel घेईन. anyway बाईकवरचा एक मस्त Vedio मी Share केलाय Fb वर बघितलंस का?

मिथिला:    नाही.

स्पृहा:       बघ मग!

मिथिला:   मी Fb वापरणं बंद केलय आणि Account पण Delete केलय.

स्पृहा:      आता हे काय नवीन?

मिथिला:    कोणीही Request पाठवतं.. काही जण नंबर मागतात सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने बोलण्याचा प्रयत्न करतात. त्या दिवशी एकजण म्हणाला मला भेटायला येशील का? film बघायला जाऊ. मी खूप घाबरले आणि  Account Delete केलं. जाऊदे कुठे हा त्रास सहन करायचा?

सृहा:  अगं मग Block चा Option असतो आणि मिथिला अशी घाबरत जाऊ नकोस कोणी काही बोललं ना तर बिनधास्त उत्तर द्यायचं

मिथिला:   अगं तसं नाही ग खूप भीती वाटते मला प्रत्येक गोष्टीची तुला माहितेय आणि ह्याच म्हणायला गेलीस तर आजकाल Technology  एवढी Advance आहे कि कुणी Account hack करून Missuse केला तर..  मी तर Prove पण नाही करू शकणार कि ह्यात माझी चूक नव्हती असं.

स्पृहा:        मिथिला असं घाबरत नको जाऊ कोणी काही बोललं ना तर बिनधास्त उत्तर द्यायचं बरं ते जाऊदे आपण ह्या weekendला सगळ्याजणी movie  ला जायचं का?

मिथिला:   नको गं  माझा अभ्यास बाकी आहे.

स्पृहा:     तू एकटीच अभ्यास करतेस ना?म्हणजे आम्ही वेडे?

मिथिला: अगं तसं नाही गं.. आता नाही नाही म्हणता  Exam 3 Month वर आलेय

स्पृहा:      3 Month वर 3 Week वर नाही.  बरं ऐक ना ह्या Week मध्ये आपण सगळ्या जणी Movie ला जातोय आणि तू येतेयस

मिथिला:   No way

BLACKOUT

MONTAGE 1

मिथिलाचा Scene:शाळा 
(मुलं- मुली रांगेत उभी राहून जेवण घेतायत. मिथिला पण आहे दोन तीन मुली तिच्याकडे बघून आपापसात कुजबूच करतायत आणि मग सराईतपणे त्या मिथिलाला धक्का देतात जेवणाचं ताट Teacher च्या अंगावर उलटत तस धावत त्या मुली त्या मॅमची मदत केल्याचं नाटक करतात)

मुलगी १: काय हा किती मूर्खपणा

मुलगी २: तेच ना बघून चालत येत नाही का?

मॅम:       किती वेंधळ्यासारखं वागतेस ग तू

मिथिला:  अहो पण..

मॅम:       हे सगळं तू स्वतः स्वच्छ करणारेस आणि नंतर येऊन मला भेट (मिथिलाच्या चेहरा पडलाय)

MONTAGE 2

स्पृहाचं घर

आई:      तुला काय गरज होती Social Media वरून त्या माणसाची बदनामी करायची

स्पृहा:     काय चुकीचं बोलले मी?

आई:      तुला कळत का चूक काय बरोबर काय?

स्पृहा:     Ofcourse आणि माझ्या Wall वर मी काहीही लिहेन..

आई:      असं नसतं किती भयानक माणसं आहेत ती, आम्ही काही २४ तास तुझ्याबरोबर नसतो, तुला कोणी काही केलं तर.?  

                Already त्या लोकांचा तुझ्या Dad ना Phone येऊन गेलाय. आणि त्यांनी मारण्याची धमकी दिली आहे

स्पृहा:      अगं आई काही नाही होत आणि आपण पोलिसांची मदत घेऊ ना.

आई:       तू आत्ताच्या आत्ता delete करणार आहेस आणि माफी मागणार आहेस.

स्पृहा:       मी असं काहीही करणार नाहीए

आई:       तू असच करणार आहेस नाही तर इथून पुढे तुझं सगळं कायमच बंद

स्पृहा:       But mom

आई:          Just do what I say

BLACKOUT

मिथिला:    ए तू एवढा force केलास  म्हणून तुझा मान राखून आलेय हा मी तुझ्याबरोबर…. मला काही येण्यात Intrest नव्हता खरा. (समोरचा उध्वस्त बंगला बघून घाबरते) ए आपण इकडे कुठे आलोय (सगळ्याजणी Hi करतात ह्या दोघींना मिथिला खूप घाबरलेल्या अवस्थेतच Hi करते) मला सांगा ना आपण का आलोय इकडे?

अनुष्का: ह्या बंगल्यात भुताटकी आहे असं कळलंय

किमया:       तू येणार नाहीस म्हणून आम्ही Movie च कारण सांगितलं.

नेहा:          ए चला गं

मिथिला:   ए थांबा तुम्ही इकडे. आत जाऊन काय करणार आहात? काय Interview घेणार आहात का त्या भुतांचा

अनुष्का:    तसंच काही समज

मिथिला:   डोकं फिरलंय का तुमचं? स्पृहा च्या नादाला लागून तुम्ही सुद्धा नको ते धाडस करताय.

नेहा  :        आम्ही सगळ्यांनी सुयश बरोबर बेट लावलेय. तो असं  म्हणाला कि तुम्ही कसल्या फट्टू मुली जाताय तिकडे….

मिथिला:   काहीतरी फेकू नका. मग तो कुठे आहे?

(नेहा सुयशला Phone लावते सुयशला इशारा करायला सांगते सुयश एक Torch मारतो तस Torch चा एक प्रकाशझोत येतो)

नेहा:        त्या तिकडे बघ जिथून एक Light येतोय, बघ तिकडेच तो राहतो. तोच तर म्हणाला होता कि, आम्हाला इकडे चित्रविचित्र आवाज येतात. संध्याकाळी ६ नंतर कुणी फिरकत नाही इकडे..

स्पृहा:    अगं आत जाऊनच दाखवू त्याला फट्टू मुली समजतो ना आपल्याला आणि आपण सगळ्या जणी एकत्र आहोत ना मग का घाबरतेयस आणि तेवढाच एक अनुभव

मिथिला:  आपला जीव महत्वाचा कि Thrilling? तुम्ही घ्या तो Thrillingचा अनुभव मी निघाले.

किमया:   काय गं रडतेस नुसती आजपासून आपण ना हिला cry machine बोलूया

स्पृहा:       machine is good one but we shood call her happy meal

नेहा:      का?

स्पृहा:    अगं ते restaurant मध्ये असतात ना fries + burger + noodels = meal तसे

नेहा:       पण त्याच काय लॉजिक आहे?

स्पृहा:    अगं म्हणजे हीच रडणं + fear  म्हणजे आपली entertainment

मिथिला:  bye मी निघतेय

शर्वाणी:   ए बाळा जा हा जा. हा आपल्या City च्या एका टोकाचा Area आहे इथे रिक्षा मिळणं कठीण काम आहे.

किमया:   किंवा बाहेर थांब एकटीच पण आम्ही आत गेल्यावर कधी काय घडेल काही सांगू शकत नाही.

मिथिला: चला मी येते

अनुष्का: तू नक्की आत येतेयस

मिथिला: अगं हो

(मिथिला नाईलाजाने त्यांचा बरोबर आत जायला निघते. जाताना बंगल्याचा दरवाजा ढकलते, तोच एक पांढरा हात तो दरवाजा पकडतो.)

(तुटक्या खिडकीतून सगळ्याजणी आत शिरतात) (बंगल्याचा आतील दृश्य)

शर्वाणी:     इकडे खूप वर आहे ना?

अनुष्का:   इथे एक वेगळाच वास येतोय गं!!!

नेहा:         ए गप रहा आवाज करू नका आणि आजून शोध घ्यायला  सुरवात नाही झालेय, तर लगेच कसले वास यायला लागले तुला?

स्पृहा:     अगं मिथिला तिकडे काय करतेयस अगं ये इकडे

मिथिला:   नाही नको

स्पृहा:     अगं ये सांगतेय ना

(खिडकीतून एक हात मिथिलाला पकडण्यासाठी येतो, मिथिला पुढे सरकते तोच त्या हातातून मिथिला फसते)

(नेहा तिकडे असलेल्या football ला keek  करते आणि तो ball  परत येतो नेहा घाबरते आणि स्पृहा कडे जाते)

स्पृहा:     अगं त्यात काय आहे एवढं  ball  आहे ना तो इकडचाच कुठचा तरी असेल एवढं काय आहे त्यात

(इतक्यात टेबलवर ठेवलेली बाटली खाली पडते सगळे दचकतात. घाबरत घाबरत स्पृहा बाटली उचलते, बाटली पुन्हा खाली पडते)

स्पृहा:    हवेमुळे झालं असेल चला पुढे बघूया

नेहा:      ए खरंच हवेमुळे पडली असेल का गं?? मला थोडा Doubt यायला लागलाय आता

शर्वाणी  : ए गप काही झालेलं नाहीए

(इतक्यात एका खोलीतून कुणाच्या तरी चालत जाण्याचा आवाज येतो सगळ्यांचं लक्ष तिकडे जात आहे Scene खूप Intence पद्धतीने वर जातोय Door open  करतात कुणीच नसतं)

(मिथिला घाबरली आहे)अचानक Light on - off व्हायला लागतात काही क्षणांसाठी पूर्ण जातात.

मिथिला: अरे कुठे आहेत तुम्ही सगळे अरे सांगा ना (सगळ्यांना हाक मारते)

मिथिला: कोण आहात तुम्ही? माझ्या मैत्रिणी कुठेयत सगळे आणि मिथिलाच्या दिशेने येतायत ती घाबरत पाठी पाठी जातेय कुणालातरी धडकते आता ती लोकं पण तिच्या दिशेने येतायत ती ओरडत ओरडत मैत्रिणींपाशी येते. (सगळ्या मैत्रिणी तिला समजवतायत, तिला भास झालाय)

स्पृहा:    ए गप बस काही झालेलं नाहीए

नेहा:      ए घाबरट तोंड बंद ठेव तुझं

किमया: खरंच cry machine आहे हि

मिथिला: तुम्हाला कळतंय का कि आपल्या सगळ्यांचा जीव धोक्यात आहे इकडे

स्पृहा: काय सारखं रडतेस इकडे जे काही होतंय ते आपल्या सगळ्यांबरोबर होतंय ना..

मिथिला: काय आहे. तुझ्यामुळेच आलेय मी इकडे म्हणे

(तेवढ्यात एक आतून आवाज येतो cry machine……  बाईची किंकाळी येते आणि जागची खुर्ची हलते)  

ईशा:     आपण इथे येऊन चूक नाही ना केली

नेहा:       बंगला बंद आहे मग Lights का आहेत. I mean जर कुणी राहतच नाही तरी..

शर्वाणी:   सुयश म्हणाला बंगल्याची पहाणी अधून मधून नोकर करून जातो,  पण तो ही सकाळच्या वेळात  

किमया:   आणि हो असंही बोललेला कि एकदा एक जण रात्रीच्या वेळी आत गेला पण तो परत आलाच नाही बाहेर पोलिसही एकदा तपास करून गेले पण त्यांना काही मिळालं नाही

(इतक्यात एका बाईची किंकाळी ऐकू येते सगळे घाबरतात, पुन्हा दरवाजा वाजायला लागतो, खुर्ची जागची हलते, Light जातात.)

नेहा:      मला खूप भीती वाटायला लागली आहे

स्पृहा:    घाबरू नका, काही नाही होणार आपण इथून पळून जाऊ

ईशा:     जर वाचलो तर पळून जाऊ शकू ना??

स्पृहा:    जाऊ म्हटलं ना, मिथिला हात सोडू नकोस. मी रस्ता शोधतेय

(मिथिला बॅटरी उचलते Torch मारते तर एक वेगळीच बाई तिथे उभी आहे. ती किंचाळते, खोलीत हळूहळू धूर व्हायला लागतो. मिथिला एकटीच खूप घाबरून जोरात पळून जाते. सगळ्यांची आरडाओरड होते)

BLACKOUT

(येतात तेव्हा एका तळघरात स्पृहा, नेहा, आदिती, ईशा ला खुर्चीला बांधून ठेवलंय.. काही पेटारे ठेवलेत त्यातून उग्र वास येतोय,  २-३ माणसं कामं करतायत)

गुंड : सर हा माल कुठे पोचवायचा  

गुंड   : ए माझ्याशी ह्या आवाजात बोलू नको  माल नीट जपून पोहचवा, तुम्ही पुढे निघा आणि तू वर एकदा नजर टाकून ये रे

(मुलींना अंधारात दिसलेली बाई येते)

बाई:       सर त्या मुलींच काय करायचं आहे?

गुंड १:  करायचं काय तेच , जे इथे आल्यावर प्रत्येक माणसाचं होत तेच….. आणि हे घर Hunted नसून Hunted आहे असं आपण भासवतो वेगवेगळे आवाज काढून, खुर्च्या वगैरे हलवून आणि हे लोकांना खरं पण वाटतंय……..  का? तर ह्या प्राण्यांच्या कातड्याचा Business करता यावा म्हणून आणि हे न कळण्याइतक्या तर ह्या मुली नक्कीच मूर्ख नाही.

स्पृहा:     काका सोडा ना आम्हाला आमचा जीव कोंडतोय इकडे

माणूस:    गप तुमचा जीव कोंडावा म्हणूनच तुम्हाला इकडे तळघरात बांधून ठेवलंय तू लक्ष ठेव ह्यांच्यावर, मी येतो माल बघून

शर्वाणी:   तुमच्या नादाला लागले आणि इथे फसले

नेहा:      आमच्या काय स्पृहाच्या म्हण

स्पृहा:     तुमची अक्कल काय शेण खायला गेली होती का?मी जबरदस्तीने थोडी आणलं.
(स्पृहा च्या मनात खूप विचार यायला सुरवात होतात, कारण सगळं तिच्यामुळे घडलेलं असत तिनेच सगळ्यांना इकडे आणलेलं असतं, ती घाबरते)
अहो "काका" सोडा ना आम्हाला Please आम्ही आमचं तोंड बंद ठेवू

गुंड १  : त्याची तू काळजी करू नकोस बाळा तुमचं तोंड कायमचं बंद करण्याची जबाबदारी माझी

(तो इसम तिच्या डोक्यावर पिस्तूल ठेवतो)

गुंड  : चांगला सगळा Game खल्लास करून टाकतो कि नाही बघा. कोणी रे कोणी यायला सांगितलं इकडे तुम्हाला?  

स्पृहा:     आमची चूक झाली आम्ही इथे परत कधीच येणार नाही

गुंड १:    हा विचार इकडे येण्याअधी करायला हवा होता (हसतो)

(तो बंदुकीचा चाप ओढणार इतक्यात त्याच्या हातावर एक अवजड वस्तू (मोठा ट्रे) पडते. मिथिला फेकून मारते. डोळ्याजवळ खूप मार बसल्यामुळे तो कळवळून खाली पडतो. मिथिला धावत घाबरत मैत्रिणींना सोडवायला येते ती बाई त्या मुलींच्या दिशेने येतेय.)

(इतक्यात तो माणूस मिथिलाकडे गोळी झाडतो.. मिथिला हुशारीने ती गोळी चुकवते स्पृहा त्या बाई शी खूप नडते आणि मिथिला धाडसाने त्या बाईला सुद्धा काहीतरी फेकून मारते त्यामुळे ती बाई ते चुकवून घाबरून पळून जाते. स्पृहा आणि मिथिला ईशा, नेहा, आदितीला सोडवतात, पुन्हा तो माणूस गोळी चालवण्याचा प्रयत्न करतो पण तेवढ्यात मिथिला Light चा Main switch बंद करते आणि अंधारात गोळी झाडण्याचा आवाज येतो)

BLACKOUT

आत्त्ताच आलेल्या खात्रीलायक सूत्रानुसार शहरापासून बऱ्यापैकी लांब असलेल्या V.A कॉलनीतील मैत्रीह्या बंगल्याबाबतीतला धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  सदर बंगल्यात अमानवी शक्ती असल्याचा आभास निर्माण करून, प्राण्यांची शिकार करून त्यांच्या कातड्यांची बहुमूल्ल्यात विक्री केली जात होती. मात्र काही मुलींच्या मदतीने हे रहस्य उघडकीस आलंय. पोलिसांनी आरोपींना पकडलं असून आता समाजातील प्रतिष्ठित म्हणवणाऱ्या किती लोकांचा ह्या प्रकरणात सहभाग आहे हे लवकरच उघडकीस येणार आहे. अमिता सारंग सोबत पहात रहा फक्त महाराष्ट्र माझा

(Media वाल्यांचा गोंधळ ऐकू येतो Lights येतात)

Media १.: तुम्हाला हे आधीपासून माहिती होत का किंवा कळलं होत का??

Media २.: तुम्हाला ट्रे फेकून मारताना कसं वाटलं?

Media ३.: तुम्हाला तुमचे आई वडील ओरडले नाहीत का?

Media ४.: तुमच्या पायाला अंधारात गोळी लागली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं?

(त्या मुलींवर प्रश्नांची वर्शावली चालू आहे)

Media ५.: अरे ए शांत बसा, शांत बसा एकेकांनी विचारा आधी मी विचारतो तर, जाण्याच्या निर्णयापासून ते अगदी शेवटपर्यंत भीती नाही वाटली?

स्पृहा:       (हसत पण गंभीर)  वाटली ना!आणि खरं सांगायचं झालं तर, ह्या प्रसंगामुळे आता वाटायला लागली. तिथे गेल्यावर जे प्रसंग ओढवत गेले त्यामुळे वाटलीच भीती म्हणजे थोडं Philosophical बोलतेय मोठ्या माणसांसारखं.  पण येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून माणूस हा शहाणा होतो असं म्हणतात. हे १००% खरं असलं तरी शहाणपणा यावा म्हणून अगदी प्रत्येक अनुभव यायलाच  हवा असं नाही आणि आपण अगदी कितीही धीट असलो कशालाही घाबरत नसलो तरी प्रत्येक गोष्टीत आपला Overconfidence असलाच पाहिजे असं नाही. विषाची परीक्षा कशाला?एखाद्याचा कोणी खून केला कि तो  IPC act 366 मध्ये येतो एखाद्याला कोणी किडन्याप केलं कि ते  act 305 च्या मध्ये येत आणि आता आमच्याबाबतीत जशी प्राण्यांच्या कायद्यांची तस्करीची जी घटना घडली ती  act 1972  च्या अंडर येते technology  मुळे हि माहिती आपल्याला सहज  उपलब्ध होते याचा अर्थ  आपण हुशार किंवा समजूतदार झालो असा नाहीए. आज आम्ही हे जे काही धाडस केलं नसतं तर माझ्या information   मध्ये असलेला act 1972  हा कायम information राहिला असता.आणि जे मोठे सांगतात ना ते  खरच ऐकावं हे पटू लागलंय आता मला पण आपण त्यांचं ऐकतच नाही.  आपण त्यांना  प्रत्येक वेळेला वेड्यातच काढतो,  पण आज हे मला कळून चुकलंय." आज आमची ह्या प्रसंगातून सुखरूप सुटका झाली. कदाचित हि गोष्ट आमच्या  जीवावरही बेतली असती. कुठल्याच गोष्टीची भीती नसणं हे मारक ठरू शकतं आपल्याला.

 (थोडी Emotional होते)  

Media ५.: मिथिला तू काय सांगशील?

मिथिला:    निश्चितच मी स्पृहा शी सहमत आहे. कोणतीही शहानिशा न करता, पुढचा मागचा विचार न करता ती गोष्ट करण्याचं धाडस करणं हि चूक आहेच पण कायम सगळ्याच गोष्टींना घाबरून, बिथरून जाण हे ही तितकच चुकीचं आहे असं वाटतं. त्या दिवशी आलेल्या प्रसंगामुळेच धीटपणे मी काही पावलं उचलू शकले. माझ्या मैत्रिनींना तो गुंड मवाली गोळी मारताना बघून माझ्यात एक हिम्मत आली, काहीही झालं तरी  मैत्रिनींना वाचवलंच पाहिजे ह्या हेतूने मी त्याला तो ट्रे फेकून मारला आणि त्यामुळेच आपण काहीतरी करू शकतो हि हिम्मत माझ्यात जागृत झाली. It was turning point of my life. हा अनुभव खूप काही शिकवून गेला. 

Media 3: स्पृहा आता तुझा पाय कसा आहे?तुझ्या पायाला ह्या प्रसंगात गोळी लागली होती?

Media 4: डॉक्टर काय म्हणालेत?किती दिवस लागतील?

( media वाले प्रश्नांचा भडीमार करत आहेत. स्पृहा चा चेहरा emotional झालाय तिला रडायला येतंय)


रंगमंचावर प्रकाश येतो

(स्पृहा चेयर वर बसलेली आहे. अभ्यास करतेय पण लक्ष लागत नाहीए. खिडकीतून बाहेर तीच लक्ष आहे, बाहेरून आवाज येतोय दोन मुली बेट लावतायत:

- अगं आपण त्या साक्षी ला करूनच दाखवू ट्रॅक वरून चालून दाखव म्हणे
- नाहीतर काय कोणाशी बेट लावतेय ह्याचा तरी विचार करायचा बेट लावताना (दोघी हसतात)
- तिला बोलव फोन करून लवकर किती वेळ झाला आजून आली नाहीए
- येईल थांब
- तिला वाटतंय आपण कंगळूच शकणार नाही ट्रॅक वर (हसतात
)

( स्पृहा उठायचा प्रयत्न करते, तेवढ्यात मिथिला येते)

मिथिला: अगं स्पृहा कुठे जातेयस

स्पृहा: अश्या किती बेट लावून जिंकलोय आपण ट्रॅक वर काय असं चालून दाखवू आणि ते पण समोर रेल्वे येताना. मिथिला मला सोड ना तिकडे त्यांच्याकडे

मिथिला: वेडी आहेस का तू आता आपण कुठच्या कंडिशन्स मधून आलोय आणि तू परत तेच करायला जातेयस

संपूच: नाही मिथिला मी त्यांना अडवायला जातेय हे सगळं करण्यापासून आपल्या बाबतीत जे काह घडलं हे त्यांचा बाबतीत घडायला नकोय

(दोघी एकमेकींकडे बघतात स्पृहा मधला झालेला बदल मिथिला ला कळल्यामुळे मिथिला खूप खुश होऊन तिला मिठी मारते)

(पडदा)