२२ मार्च - जागतिक जल दिन

२२ मार्च - जागतिक जल दिन

लेखन व मांडणी: अमृता विशाल


स्रोत

आज, २२ मार्च रोजी जगभरात जलदिन साजरा केला जातो. त्याबद्दल ही माहिती:

>> २२ मार्च १९९३ रोजी, संयुक्त राष्ट्रांनी आपल्याकडे असलेल्या गोड्या पाण्याचे (fresh water) महत्त्व लोकांना कळावे म्हणून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
>> शुद्ध, स्वच्छ आणि कायमस्वरूपी पाणी मिळणे हा सर्वांचा मूलभूत हक्क आहे.
>> आजही, खूपशा भागांमध्ये अनेक लोकांना त्यांच्या घरात, गावांमध्ये, शाळांमध्ये पुरसे पाणी मिळत नाही.
>> रंग, जात, लिंग, स्त्रिया-मुले, निर्वासित, दिव्यांग, श्रीमंत-गरीब, अल्पभूधारक अशा भेदभावामुळे हे लोक पाण्यापासून वंचित राहतात. निर्णय प्रक्रियेमध्ये या लोकांचा आवाज ऐकला जावा म्हणून यंदाचा विषय आहे, Leaving No one Behind : पाणी सर्वांसाठी.

पाण्यासंबंधित विविध विषय, समस्या यांची ओळख व्हावी म्हणून दरवर्षी एका विषयाची निवड केली जाते. त्या विषयाला अनुसरून वेगवेगळ्या उपक्रमांचे, कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन होते. अनेक देश आता हा दिवस साजरा करतात.
यंदाचा दुष्काळ, लक्षात घेता “पाणी सर्वांसाठी” उपलब्ध होण्यासाठी आपण पण हातभार लावूयात.

जागतिक जल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

-------------------

The world has enough for everyone's need, but not enough for everyone's greed - Mahatma Gandhi

महात्मा गांधीजींनी म्हणाल्याप्रमाणे, आपली पाण्याची  गरज नेमकी किती आहे; हे ओळखण्यासाठी खालील कृती करून बघूया.

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला कोणकोणत्या कामाला पाणी लागते आणि ते किती लागते. पाणी किती लागते हे मोजताना एका ठराविक एककाचा वापर करा जसे की बादली, मग किंवा १ लीटरची बाटली.  आपल्या आईबाबांसोबत याबद्दल चर्चा करा.