फॅन फिक्शन: X-avengers: a game of dimensions
X-avengers: a game of dimensions
लेखन आणि चित्र: ऋजुल
इयत्ता ८ वी, अक्षरनंदन , पुणे.
चॅप्टर १
नेक्स्ट अव्हेंजर्स
न्यूयॉर्क २०३०
सगळे कोअर अव्हेंजर्स नामशेष झाल्यामुळे उरलेले अव्हेंजर्स अजून सुपरहिरोजच्या शोधात होते. 'लास्ट वॉर'नंतर स्कार्लेट विच (वांडा मॅक्सिमोव), डॉ. स्ट्रेंज, सॅम विल्सन (फाल्कन/नेस्ट कॅप्टन अमेरिका), स्पायडरमॅन (पीटर पार्कर), ant man (स्कॉट लँग), वॉस्प (होप वांडायन)कोअर एवेन्जर्सच्या जागी काम करायला लागले होते. त्यानंतर काही दिवसांनी, त्यांना एक्स स्कूल ढासळल्याची बातमी मिळाली. मग स्कार्लेट विचच्या असं लक्षात आलं, की म्युटंटसनासुद्धा आपल्याला अव्हेंजर्समध्ये घेता येईलच की. पण, सोर्सेसर सुप्रीममधल्या कोणालाच ही कल्पना आवडली नाही. त्यामुळे वॉग आणि डॉ. स्ट्रेंजला सोर्सेसर सुप्रीमपासून वेगळं व्हावं लागलं. त्यांना हे माहित होतं, की टाईम स्टोन गेल्यामुळे डॉरमामू पृथ्वीवर परत हल्ला करून, ती ताब्यात घ्यायचा प्रयत्न करेल. त्यासाठी आपल्याला तयारी करण्याची गरज आहे. x-menना टीममध्ये घेण्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागणार होते. एक्स स्कूल ढासळल्यामुळे सगळेच म्युटंट भरकटले होते. याच विषयावर चर्चा करण्यासाठी, १३ डिसेंबर २०३० रोजी नेक्स्ट अव्हेंजर्सची पहिली मीटिंग ठरली.
चॅप्टर २
पहिली मीटिंग
न्यूयॉर्क २०३०
या मीटिंगमध्ये अव्हेंजर्स आणि x-men यांची एक टीम करायची का, यावर चर्चा होणार होती. सगळे आल्यानंतर मीटिंग सुरु झाली. स्कार्लेट विचने पुढाकार घेऊन मीटिंग सुरु केली व ती म्हणाली, "स्टार्क नेटवर्कद्वारे आपल्याला जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार असं लक्षात आलं आहे, की इंडोनेशियामध्ये लीथबर्ग नावाच्या माणसाने हल्ला केला होता. तो हल्ला तिथल्या ७ लोकांनी परतवून लावला. परंतू त्या ७ जणांची ओळख पटवता आलेली नाहीये. आम्हाला अशी शंका वाटते, की हे ७ जण एक्स स्कूल मधले म्युटंटस असावेत. ते आपली ओळख लपवून इंडोनेशियामध्ये राहत असावेत. आपल्याला त्यांच्याशी बोलायला, त्यांना भेटायला तिथेच जावे लागले. मि.विल्सन आणि मि.पार्कर तुम्ही ही जबाबदारी घ्याल का?"
त्यावर सॅम विल्सन म्हणाला, "पण अशीही शक्यता आहे, की लीथबर्ग चांगला असेल आणि ते ७ जण धोकादायक असतील. असं असेल तर आपण काय करणार आहोत?"
त्यावर स्कार्लेट विच म्हणाली, "आता नताशा असती तर बरं झालं असतं."
होप वांडायन म्हणाली, "ते आपल्या हातात नाही. निसर्गनियमानुसार जे निर्माण होतं ते नष्ट होतंच. तिची जागा कोणीच घेऊ शकणार नाही, पण आत्ताच्या परिस्थितीत मी हे काम करू शकते."
वांडा म्हणाली, "ठीक आहे. हे ठरले! थायनॉसनंतर कोणते संकट समोर येईल काय माहित?" त्यावर उत्तर देत डॉ. स्ट्रेंज म्हणाला, "पुढचे कोण हे माहित नाही, पण नंतर कधीतरी कोण येऊ शकतो, ते मला नक्की माहित आहे. डॉरमामू! डॉरमामूला कधीपासून पृथ्वी ताब्यात घ्यायची आहे. तो टाईम स्टोन नष्ट झाल्यामुळे येण्याची दाट शक्यता आहे. आता त्याच्याकडे कायसिलीअस आहे, मॉरडो आहे. कदाचित अख्खे सोर्सेसर सुप्रीम येईल. आपल्याला काहीही करून त्याला थांबवावे लागेल."
पीटर पार्कर म्हणाला,"एक-एक मिनिट, खरंच आपण x-men बरोबर एकत्र काम करणार आहोत का?"
मग डॉ. स्ट्रेंज म्हणाला, "हो! माझ्या मते तू जर सॅटेलाईटवरून कोणी म्युटंटस दिसत आहेत का, हे शोधलंस तर बरं होईल." वांडा म्हणाली, "ठीक आहे. तो पर्यंत आपण वाकांडामध्ये जाऊन येऊ. आता आपण सगळे २८ जानेवारीला परत भेटू. ऑल द बेस्ट!"
चॅप्टर ३
लीथबर्ग
इंडोनेशिया २०३० आणि साऊथ आफ्रिका २०३०
जेंव्हा वॉस्प इंडोनेशियामध्ये गेली, तेंव्हा तिला ते सात जण सापडायला काहीच वेळ लागत नाही आणि तिला हेही कळलं कि ते म्युटंटस नव्हते. इंडोनेशियामध्ये ते ७ जण खूपच प्रसिद्ध झाले होते. विल्मा, रोडॉल्फस, फ्रॅनी, जॅक, एमा, सेंट आणि लारा होते ते . यातले विल्मा, लारा आणि सेंट हे आधीचे S.H.I.L.D. एजन्ट्स होते पण हायड्रामध्ये सामील झाल्यामुळे पूर्वी त्यांना S.H.I.L.D.मधून बाहेर काढलं होतं. नताशाचा बदला घेण्यासाठी ते तयारी करत होते. त्यांनी अख्ख इंडोनेशिया ताब्यात घेतलं होतं. आता ते एक आर्मी बनवत होते . हे कळल्यावर होपने लीथबर्ग चा शोध घ्यायला सुरवात केली . साऊथ आफ्रिका मध्ये एका ठिकाणी तिला लीथबर्ग सापडली . तिचं खरं नाव निकिता होतं . निकिताकडून होपला कळले, की सेवन सुपर एजन्सीमधले लोकं म्हणजेच ते ७ जण तिच्या मागे लागले आहेत. यावरून होपच्या लक्षात आले,की लीथबर्गला एक्सवेन्जर्समध्ये सामील करून घ्यायला काहीच हरकत नाहीये. तिची मदतच होईल. होपने तिला तसे विचारल्यावर निकिताने लगेच होकार दिला. निकिताला म्युटंटस कुठे आहेत ते माहीत असल्यामुळे एक्सवेन्जर्सची टीम बनवायला तिची मदतच होणार होती. होप निकिताला घेऊन न्यूयॉर्कला परत आली.
चॅप्टर ४
एक्सवेन्जर्स
न्यूयॉर्क २०३० आणि वाकांडा २०३०
ठरल्याप्रमाणे स्कार्लेट विच, फाल्कन आणि ant man वाकांडामध्ये पोचले. तिथे त्यांना कळलं की वाकांडातील ब्लीस ब्लॅक नामक रोगामुळे ब्लॅक पँथरचा मृत्यू झाला आहे आणि आता शूरी ब्लॅक पँथर आहे. वाकांडाचा राज्यकारभारही तीच सांभाळते आहे. त्यांची व शूरीची भेट झाल्यावर शूर म्हणाली, "आम्ही इथे वाकांडामध्ये असा एक सेरेब्रो तयार केला आहे, ज्याचा मदतीने एक पूर्ण शहर एखाद्या डिमेंशनपासून सुरक्षित ठेवता येऊ शकतं."
"हे फारच उपयुक्त संशोधन आहे, शूरी. आपल्याला याचा भविष्यात फार उपयोग होऊ शकेल. याचा वापर करण्याची परवानगी वाकांडीयन आम्हाला देतील का?", स्कार्लेट विच म्हणाली.
यावर शूरी म्हणाली, "नक्कीच. भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठीच हे संशोधन आम्ही केले आहे." लवकरच शूरीला बरोबर घेऊन ते तिघेही नवीन सेरेब्रोसहित न्यूयॉर्कला जायला निघाले. त्याचवेळी पीटर पार्करही चार्ल्स झेवियरना शोधून न्यूयॉर्कला येऊन पोचला. शूरीचा सेरेब्रो बघून चार्ल्स झेवियार म्हणाले, "हा तर सेरेब्रो आहे. यामुळे आपण बाकीच्या म्युटंटसना सहज शोधू शकतो. आता अजून वेळ वाया न घालवता काम सुरु करूयात."
बाकी म्युटंटसना शोधण्याचे काम संपल्यावर चार्ल्स झेवियर म्हणाले, "शूरी, हा सेरेब्रो अतिशय उत्तम आहे. फार ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली आहे तुम्ही. याची शक्ती शत्रूच्या मेंदूचा ताबा घेऊन ७ तासांपर्यंत कंट्रोल करू शकते."
डॉ. स्ट्रेंज म्हणाला, "प्रोफेसर, हा सेरेब्रो वापरून तुम्ही डॉरमामूचा शोध घेऊन त्याच्या मेंदूमध्ये डोकावून बघू शकाल का?" चार्ल्स झेवियर म्हणाले, "हो, आपण प्रयत्न करून बघू शकतो."
प्रोफेसर चार्ल्स झेवियर डॉरमामूला शोधण्यात आणि त्याच्या मेंदूत डोकावून बघण्यात यशस्वी होतात. त्यामुळेच सर्वाना कळतं की डॉ. स्ट्रेंजचा संशय खरा होता आणि पुढचं संकट डॉरमामूच असणार होता. मॅग्नेटो, जीन ग्रे, क्विक सिल्वर आणि मिस्टिक भारतात, पुण्यात आहेत हे म्युटंटसचा शोध घेताना समजल्यामुळे त्यांना घ्यायला सगळे भारतात जायला निघतात.
चॅप्टर ५
फर्स्ट अटॅक
भारत, पुणे २०३०
अव्हेंजर्स म्युटंटसना शोधायला भारतात, पुणे या शहरात पोचतात. शोध घेताना त्यांना म्युटंटस पर्वतीपासून शनिवारवाड्यापर्यंत असलेल्या भुयारात ते सापडतात. अव्हेंजर्ससोबत चार्ल्स झेवियर आहेत हे बघून म्युटंटसना बरं वाटतं.
त्यावेळी डॉरमामूचा पुण्यातच पहिला हल्ला होतो, कारण तो लहान असताना त्याने भारतात झालेल्या लढाया पहिल्या असतात व त्याला भारतातील किल्ल्यांचं आकर्षण वाटत असत. डॉरमामूचा सर्वात आधी भारत ताब्यात घ्यायचा प्लॅन असतो, त्यामुळे तो पुण्यातील सिंहगडावर हल्ला करतो.
नेमके त्याचवेळी अव्हेंजर्स आणि x-men पुण्यातच असल्याने ते सिंहगडावर पोचतात. एक शेवटचा प्रयत्न करायचं म्हणून डॉ. स्ट्रेंज डॉरमामूकडे जातो आणि म्हणतो, "dormammu I've come to bargain." त्यावर डॉरमामू उत्तर देतो, "You can't bargain now. The Time Stone is gone."
तेवढ्यात चार्ल्स झेवियरना कल्पना सुचते आणि ते सेरेब्रो घालतात. डॉरमामूच्या मेंदूत प्रवेश केल्यावर ते म्हणतात, "He can't , but I can! डॉरमामू तू आता पुढचे ७ तास माझ्या कंट्रोलमध्ये राहशील."
त्यानंतर अव्हेंजर्स आणि x -men न्यूयॉर्कला परत जातात.
चॅप्टर ६
पुढची मीटिंग
न्यूयॉर्क २०३०
न्यूयॉर्कमध्ये पोचताक्षणीच सर्वांनी पुढचे प्लॅनिंग करायला सुरवात केली. डॉ.स्ट्रेंज म्हणाला, "डॉरमामू इथे आला की प्रथम त्याचा मेंदू ताब्यात घेतला पाहिजे."
"हे काम मी, जीन ग्रे आणि प्रोफेसर करू," स्कार्लेट विच म्हणाली. पीटर पार्कर म्हणाला , " तुम्ही हे केले की आम्ही सर्व त्याच्यावर हल्ला करून त्याला नष्ट करून टाकू."
तेवढ्यात गार्डियन ऑफ गॅलॅक्सिची टीम एक वाईट बातमी घेऊन तिथे पोचली. गोमोरा म्हणाली, "आम्हाला आत्ताच काही वेळापूर्वी कळलं आहे की, asgard मध्ये असं एक पुस्तक आहे, ज्यात असं लिहिलेलं आहे, की मृत्यू म्हणजे फक्त डिमेंशन बदलणे. म्हणजेच सर्व मृत व्यक्ती आपल्या डिमेंशनमधून दुसऱ्या डिमेंशनमध्ये जातात फक्त. आपले सर्व मृत अव्हेंजर्स देखील त्याच डार्क डिमेंशन मध्ये गेले असणार."
डॉ. स्ट्रेंज म्हणाल, "अरे बापरे! म्हणजे आता आपल्याला डिमेंशन लॉक करता येणार नाही. तसे केले तर कोणीच मारणार नाही आणि हे तर निसर्गनियमांच्या विरुद्ध होईल." चार्ल्स झेवियर म्हणाले, "म्हणजे डॉरमामूला नष्ट करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही."
"डॉरमामूला नष्ट केले तरच गेम ऑफ डिमेंशन संपेल आणि डार्क डिमेंशन डॉरमामूपासून मुक्त होईल.", जीन ग्रे म्हणाली. यावर कोणी काहीच बोलले नाही आणि मीटिंग संपली.
चॅप्टर ७
माईंड ऑफ डॉरमामू
डार्क डिमेंशन
पृथ्वीवर हे सर्व घडत असताना डॉरमामूच्या मनात असा विचार चालू होता की, 'अव्हेंजर्स आणि x -men मला ७ तासांपर्यंत रोखून ठेवू शकतात. तर हे ७ तास मी मृत अव्हेंजर्सना वापरून घेईन आणि ७ तासानंतर मी हल्ला करेन. जर ते माझ्यापेक्षा जास्त शक्तिशाली असतील, तरच ते माझा हल्ला परतवून लावू शकतील. पण तसं होईल असा मला वाटत नाही. त्यांचा प्लॅन नक्कीच मला आणि डार्क डिमेंशन लॉक करण्याचा असणार. पण हाच तर माझा गेम आहे. त्यांना हे नक्कीच माहीत नसणार की त्यांनी माझी डार्क डिमेंशन लॉक केली, तर कोणी मरणारच नाही. मला माझ्या नवीन आर्मीला सूचना द्यायला हव्यात.'
डॉरमामू त्याच्या नवीन आर्मीकडे वळून म्हणाला, "किमान ७ तास तरी तुम्हाला त्यांना अडवून धरावे लागेल."
चॅप्टर ८
शेवटची मीटिंगन्यूजर्सी २०३०
नेक्स्ट अव्हेंजर्स जे आता Xavengers झालेत त्यांची पुढची आणि शेवटची मीटिंग न्यूजर्सीमध्ये चालू झाली. सर्वात पहिला मुद्दा मिस्टिकने मंडला, "जर मृत अव्हेंजर्स जे आता डार्क डिमेंशनमध्ये आहेत, त्यांनी हल्ला केला, तर आपण काय करणार आहोत? त्यांच्याशी कसं लढायचं त्याचा विचार करायला हवा." त्यावर सर्वानुमते असे ठरले की, एजंट १, कायसिलियस आणि मॉरडो यांना डॉ.स्ट्रेंज बघून घेईल. नताशावर क्लिंट(हॉक आय) लक्ष केंद्रित करेल. टोनी स्टार्कला मॅग्नीटो हरवू शकेल. कॅप्टन अमेरिकाला नवीन कॅप्टन अमेरिका म्हणजेच फॅल्कन व विंटर सोल्जर आणि क्विक सिल्वरला क्विक सिल्वरच हरवू शकेल. बाकी सर्व त्यांचे लक्ष्य डॉरमामूवर केंद्रित करतील. प्लॅनिंग चालू असतानाच वॉस्प, बातमी घेऊन थडकली. हल्ला अचानकच होतो आणि इथे तसेच झाले. न्यूयॉर्कवर डॉरमामूने हल्ला केला. प्लॅनिंग अर्धवटच टाकून सर्वजण न्यूयॉर्ककडे निघाले.
चॅप्टर ९
अखेरचे युद्ध
न्यूयॉर्क २०३०
जेव्हा ते न्यूयॉर्कला पोचले तेंव्हा त्यांना स्टार्क टॉवर ढासळलेला दिसला. डॉरमामू आला होता. हे बघून प्रोफेसर एक्सनी त्यांचा पोर्टेबल सेरिब्रो घातला आणि ७ तासांसाठी डॉरमामूवर कंट्रोल मिळवला. असं घडेल याची मृत अव्हेंजर्सना कल्पना होती, त्यामुळे त्यांनी लगेच जिवंत अव्हेंजर्सवर हल्ला केला. ब्लॅक विडो एकीकडे हॉकआय आणि बकी बार्न्सशी लढत असते. एकीकडे मॅग्निटो आणि आयर्नमॅन लढत असतात. एकीकडे फाल्कन आणि स्टीव्ह रॉजर्स युद्ध करत असतात. डॉ.स्ट्रेंज एकाच वेळी एंशंटवनशी, मॉरडो आणि कायसिलियाशी लढत असतो. आणि मग खूप गोष्टी एका क्षणात होतात.
मिस्टिक अचानक ओरडते, "या प्लॅनचा काहीच उपयोग नाहीये. पण माझ्याकडे अजून एक प्लॅन आहे! वांडा तू कर्क बरोबर डॉरमामुच्या मेंदूपाशी जा आणि तुझ्या मटेरियल चेंजिंग पावरने त्याचा मेंदू आयन, निकेल किंवा कोबाल्टचा करून टाक आणि एरीक, मग तू त्याच्या मेंदूत स्फोट करू शकशील."
यावर कर्क(नाईटक्रॉलर) ओरडतो, "ओके."
मिस्टिकच्या प्लॅनप्रमाणे स्कार्लेट विच डॉरमामुचा मेंदू लोखंडचा करते आणि मॅग्निटो(एरीक लॅनहायमर) डॉरमामुच्या मेंदूत स्फोट करतो आणि तो मरतो.
शेवटी डार्क डिमेन्शन मुक्त होते. यांनतर एक्समेन आणि अव्हेंजर्स एकत्र येऊन काम सुरु करतात.
~~~ooo~~~
सदर लेखन हे फॅन फिक्शन आहे. यातील पात्रं परिचित असली तरी ही लेखकाची स्वतंत्र अभिव्यक्ती आहे. या लेखन प्रकाराबद्दल अधिक माहिती या विकीपीडिया पानावर मिळेल