आमच्या वस्तुंची गोष्ट-२: डग्गा प्लॅनेटवरचा हा दगड

डग्गा प्लॅनेटवरचा हा दगड

लेखन : दिव्या वाघ व विराज विशे, इयत्ता पाचवी
चित्र: सोहम कुलकर्णी 
इयत्ता दुसरी, अक्षरनंदन

ए मला टेकू नको को को को कोण आहे?

मी मी डग्गा दगडू कडके.

तू कुठून आलास?

मी डग्गा प्लॅनेटवरून आलोय.

तू प्लॅनेटवरून आला म्हणजे तू छोटा असणार.

अरे मी पन्नास वर्षाचा आहे.

काय प प प पन्नास वर्षाचा? पण इतकं वय कसं काय?

अरे तुम्हाला माहिती नाही आमच्या प्लॅनेटवरून हजार हजार वर्ष टिकू शकतात.

पण तू इथे कसाकाय आलास?

अरे तुम्हाला माहिती नाही आमच्या प्लॅनेटवर खूप हल्ले होतात, म्हणून मला त्यांना मारण्यासाठी मिशनवर पाठवले. पण, त्या मिशनवर जातावेळेस माझ्या स्पेशीपवर दुश्मनांच्या स्पेशीपने हल्ला केला. म्हणून मी स्पेशीपवरून इथे या जागेवर पडलो.

मग तू अता तुझ्या घरी कसं जणार? तुला तुझ्या घराची आठवण येत नाही का?

अरे मला पहिल्यापासून घरच नाहीये.

तुला भारी वाटतंय इथे?

हो, भारी तर वाटतंय.

मग तू माझ्याशी मैत्री करशील का?

हो

ये ये डग्गा डग्गा दगड कडके मेला.

मी मेलेलो नाहीये.

मी माझी बॅटरी चार्ज करतोय.

-----------------------------------------

 

ही कथा लिहिण्यामागची प्रक्रिया समजून घेण्यासाठी ही प्रस्तावना वाचता येईल. 
ही कथा ज्या वस्तूवर रचली आहे तो दगड:

 

श्रेय अव्हेर:
सोनाळ्यातल्या मुलांसोबत काम करून त्यांच्याच भवतालातील वस्तुंशी संबंधित रचलेल्या या कथा आहेत. या आदिवासी भागातील मुलांच्या शिक्षणासाठी 'क्वेस्ट' संस्था गेले १२ वर्ष कार्यरत आहे. त्यासोबत मुलांच्या भाषिक विकासासाठी 'गीतांजली कुलकर्णी' यांनी 'गोष्टरंग' नावाचा प्रकल्प सुरू केला. या गोष्टरंगचाच भाग असलेल्या 'बालरंग' या उपक्रमाअंतर्गत 'कल्पेश समेळ'ने हा उपक्रम घेतला होता. 'अटकमटक'लाही त्यानेच या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याबद्दल त्याचे आभार. 
पुण्यातील 'उदय क्षीरसागर' यांनी या गोष्टींचे युनिकोडमध्ये टंकन करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार