आमच्या वस्तुंची गोष्ट-३: फुलवाडी

 फुलवाडी

लेखन: विद्या - इयत्ता ७वी, ** इयत्ता ४ थी
**(चौथीतल्या सहलेखकाचे नाव विचारले आहे. ते समजताच इथे प्रकाशित करू. खाली त्याचे छायाचित्र आहे)

चित्र: रिधिमा निगडे, इयत्ता दुसरी, अक्षर नंदन

 

मी आज तुम्हाला आमच्या शाळेबद्दल सांगणार आहे. माझं नाव पिवली आहे. मी ३ री मध्ये शिकते. माझा एक मित्र आहे, त्याचं नाव सुर्यफूल आहे. त्याला मी 'ए सुर्या' अशी हाक मारते. तो मला 'पिवली पिवली पिवली ए पिवली' अशी हाक मारतो.

आमची शाळा खूप दूर आहे आणि झुडपात आहे. आमच्या शाळेचे नाव जि.प. शाळा, फुलवाडी आहे. आमच्या शाळेत वेगवेगळी फुले शिकायला येतात. जास्वंद, गुलाब, कमल, शेवंती, अनंता, जाई, जुई. शाळेची राखण करण्यासाठी रातराणी फुलाला ठेवलंय.

आम्हाला शिकवायला मोगराबाई आहेत. त्या खूप छान शिकवतात. गुलाबाला खूप काटे आहेत म्हणून त्याच्या जवळ कोणच बसत नाही. त्याला खूप वाईट वाटतं.

जर आम्हाला बाहेर जायचं असलं की आम्ही हिरवा कुडता घालून जातो. आत आलो की कुडता काढून टाकतो.कारण माणसांनी आम्हाला बघितल्यावर सांगतात, किती छान फुल आहे, आता तर मी फुल खुडून माळिनच. माझ्या आईचे नाव हिरवी आणि बाबाचे नाव निळा. आणि आम्ही हसत हसत राहातो. 

-----------------------------------------

 ही कथा लिहिण्यामागची प्रक्रिया समजून घेण्यासाठी ही प्रस्तावना वाचता येईल. 
ही कथा ज्या वस्तूवर रचली आहे ते हे फूल:

 

श्रेय अव्हेर:
सोनाळ्यातल्या मुलांसोबत काम करून त्यांच्याच भवतालातील वस्तुंशी संबंधित रचलेल्या या कथा आहेत. या आदिवासी भागातील मुलांच्या शिक्षणासाठी 'क्वेस्ट' संस्था गेले १२ वर्ष कार्यरत आहे. त्यासोबत मुलांच्या भाषिक विकासासाठी 'गीतांजली कुलकर्णी' यांनी 'गोष्टरंग' नावाचा प्रकल्प सुरू केला. या गोष्टरंगचाच भाग असलेल्या 'बालरंग' या उपक्रमाअंतर्गत 'कल्पेश समेळ'ने हा उपक्रम घेतला होता. 'अटकमटक'लाही त्यानेच या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याबद्दल त्याचे आभार. 
पुण्यातील 'उदय क्षीरसागर' यांनी या गोष्टींचे युनिकोडमध्ये टंकन करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार