निकाल: अटक मटक बालनाट्य एकांकिका लेखन स्पर्धा २०१९

इथे म्हटल्यानुसार आपण अटकमटकवर सुधाताई करमरकरांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक एकांकिका लेखन स्पर्धा घेतली होती.

कळवायला आनंद होतो की त्या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि एकूण २१ संहिता आमच्याकडे जमा झाल्या.

त्या संहितांचं वाचन करून त्यातील विजेते ठरवण्यासाठी आमच्या अटकमटकच्या टीम सोबत केतकी आकडे यांनीही मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार. सदर विजेते ठरवताना पुढिल निकष आम्ही लावले आहेत

१. नाटकांची रंजकता. बालनाट्य म्हटली की ती मुलांपर्यंत पोचावी लागतात. त्यासाठी ती मुलांचे लक्ष वेधून घेणारी असणे अर्थात रंजनमुल्य उत्तम असणे हा सर्वात महत्त्वाच्या निकषांपैकी एक.
२. नाटकाची संहिता लिहिताना त्याचे मंचन कशा प्रकारे होऊ शकेल याचा किती विचार केलेला जाणवतो?
३. भाषा: नाटकाची भाषा आताच्या लहानग्या प्रेक्षकांना किती रुचेल, पचेल आणि समजेल - याचा किती विचार नाटकाच्या संहितेत जाणवतो?
४. विषय, त्याची मांडणी आणि पात्रयोजना व पात्रउभारणी

या निकषांवर स्वतंत्रपणे ही नाटके जोखून मग चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर आम्ही हे विजेते ठरवले आहेत.

आज १८ मे - सुधाताईंचा जन्मदिवस. या दिवसाचे औचित्य साधून आज हा निकाल आम्ही जाहिर करत आहोत:

प्रथम क्रमांक:
लाईक, कमेंट आणि शेअर
लेखन: अक्षय पाटील

---------------------------------

द्वितीय क्रमांक
दिडशे रुपये
लेखन: संकेत कोर्लेकर,रोहा

----------------------------------

तृतीय क्रमांक (विभागून)
ॲक्ट १९७२
लेखन: तेजस कुलकर्णी

एका झाडाची गोष्ट
लेखन: उदय गोडबोले, सांगली

-----------------------------------


सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

प्रथम क्रमांकाची एकांकिका प्रकाशित करत आहोत. येत्या काही दिवसांत एकेक करून इतर एकांकिकादेखील प्रकाशित करू. सदर एकांकिकांचे सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन आहेत. त्यांचे प्रयोग करण्याआधी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

विजेत्या एकांकिकांव्यतिरिक्त इतरही काही लेखकांनी प्रकाशनाला परवानगी दिली आहे. त्यांचेही विशेष आभार. त्याही संहिता येत्या काही दिवसांत इथे प्रकाशित होतील.

सदर स्पर्धा दरवर्षी घेण्याचा मानस आहे. तेव्हा पुढिल वर्षासाठी नवीन संहिता आताच लिहायला घ्या. शुभेच्छा!