टेकडीच्या निमित्ताने ३: ५० बिया

टेकडीच्या निमित्ताने ३:
५० बिया
लेखन व चित्रे: ओजस फाटक,(इयत्ता ७वी, अक्षरनंदन)

याधीचे भागः एक दोन

टेकडीवर वनविभागाने ३ ठिकाणी प्लांटेशन केलं आहे. एकाची उंची (जमिनीची) कमी आहे. ते दक्षिणमुखी मारुतीपाशी आहे. तिथे वड पिंपळ लावला आहे. दुसरं म्हातोबाशी तिथे बांबू आहे आणि तिसरं म्हाताबोमधून दिसणाऱ्या समोरच्या माथ्यावर. तिथे कदंब, कडुनिंब इत्यादी झाडं आहेत.

पावसाळा चालू होता. यावेळी माझा बाबाही आमच्या बरोबर आला होता. आई काम करत होती, भाऊ व बाबाचं वेगळंच काहीतरी चाललं होतं.
मला टेकडीच्या सर्वोच्च बिंदूवर म्हणजेच म्हातोबाच्या समोरच्या दगडापर्यंत जाऊन यायचं होतं.

मी गेलो.

वाटेत मला एक नवीनच मोहाचं झाड सापडलं. खाली पडलेल्या ५० बिया घेतल्या. म्हातोबाच्याही पुढे जाऊन १० खड्डे खणले आणि त्यात बिया टाकून खड्डे बुजवले.
पण, आजूबाजूला भरपूर वाटा होत्या.
मी जास्त लांब नव्हतो, साधारण कुठून आलो ते मला माहीत होतं. मी 'वेळ' व 'सूर्याची स्थिती' यावरून साधारण दक्षिण ओळखली व गेलो.

पोहचलो की म्हातोबाशी!

मग पुढचा रस्ता नेहमीचाच होता. आता या बियांच्यातून अगदी ५० पैकी ५० नाही उगवली झाडं; तरी १-२ उगवण्याची शक्यता आहेच! शिवाय मोहाच्या बियांचा नवीन स्रोतही आम्हाला कळला!

(क्रमश:)

या लेखनाचे डिजिटल टंकन करण्यास मदत केल्याबद्दल उदय क्षीरसागर यांचे आभार